शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगवी येथे हनुमान मंदिरात भरतेय लहान मुलांची शिकवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:45 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क बोराडी : कोरोना काळात काही गोष्टी अनोख्या बघायला मिळायला त्या म्हणजे कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा,कॉलेज बंद ...

 लोकमत न्यूज नेटवर्कबोराडी : कोरोना काळात काही गोष्टी अनोख्या बघायला मिळायला त्या म्हणजे कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा,कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी डिजीटल माध्यमाद्वारे मुलांचे वर्ग सुरु करण्यात आले होते.शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील लालकिराडपाडा येथे हनुमान मंदिरात आदिवासी कोकणी समाजातील तरुणांनी मुलांना पाढे आणि कविता शिकवण्यासाठी मोफत शिकवणी घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.ग्रामीण भागात पालकांची आर्थिक परिस्तिती बेताची असल्यामुळे सर्वच मुलांना स्मार्टफोन घेणे शक्य नाही.त्यामुळे गणेश देशमुख,विकास गायकवाड, दिपक दळवी या आदिवासी कोकणी समाजातील तरुणांनी मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याचा मानस व्यक्त केला.सुरुवातीला तरुणांनी गावातील मुलांचा सर्व्हे करत किती जणांकडे स्मार्ट फोन आहे याचा आढावा घेतला पण या सर्वेक्षणात फक्त काही मुलांकडे स्मार्टफोन असल्याचे समजले.तर काही मुलांच्या पालकांकडे फक्त कॉलिंगची सुविधा असलेला तर काही मुलांच्या पालकांकडे फोनच नव्हता.त्यामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये याकारणासाठी गावाबाहेरील लालकिराडपाडा येथे हनुमान मंदिरात मुलांना धडे शिकवायचे ही गणेश देशमुख यांना सुचली व मुलांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.शाळेत असताना कधी एकदा सुट्टीचा दिवस येतोय असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायचे पण या कोरोनामुळे मिळालेल्या सुट्या या मुलांसाठी कंटाळवाण्या ठरत आहेत.अशातचं या उपक्रमाचा सध्याच्या घडीला त्यांना चांगलाच फायदा झाला.विद्यार्थ्यांशी दररोज भेट होत असल्यामुळे दररोज ज्ञान दानाचे महान कार्य करण्याचे महान कार्य आमच्या हातून घडतय व समाजातील गरीब अशिक्षित पालकांच्या पाल्याना आम्ही काही देऊ शकू या पेक्षा वेगळा आनंद अशुच शकत नाही.ही सर्व तरुण दिवसभर मिळेल ती कामे करून तसेच शेतीच्या मशागतीची कामे सांभाळून रात्री वेळात वेळ काढून दररोज ही शिकवणी चालू आहे या उपक्रमाचे पाड्यावरील नागरिकांबरोबरच परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.