लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील मोगलाईतील प्रभाग क्रमांक सातमधील फुले नगर, महाले नगर आणि पंचशील नगरातील आंदोलक महिला पुरूषांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र लोंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ यांनी केली आहे़लोंढे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले असून शिरसाठ यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहेत़ त्यात म्हटले आहे की, शंभर टक्के अनुसूचित जातीच्या रहिवाशी असलेल्या या वस्त्यांमध्ये पंधरा दिवस पाणीपुरवठा झाला नाही म्हणून येथील महिला पुरूषांनी महानगरपालिका गाठून आंदोलन केले़ यावेळी आंदोलकांनी मास्क लावला होता तसेच फिजीकल डिस्टन्सिंगचे नियमही पाळले होते़ पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून आंदोलन केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षीत असताना आंदोलक महिला पुरूषांवर गुन्हे दाखल करुन प्रशासनाने अन्याय केला आहे़त्यामुळे हे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:13 IST