शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

तहसिलदारांनी पाठलाग करुन पकडले अवैध वाळूचे ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 10:27 PM

निमखेडीतील नदीपात्र : महसुल पथकासह पोलिसांची घेतली मदत

धुळे : तालुक्यातील निमखेडी येथील नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करताना सहा ट्रॅक्टर तहसीलदार किशोर कदम यांनी पकडले. या कारवाईमुळे वाळूची चोरटी वाहतूक करणाºयांना चांगलाच धसका भरला आहे. तालुक्यातील निमखेडी येथे वाळूची चोरटी वाहतूक सुरु असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली होती. त्यानुसार तहसील खात्यातील अधिकारी व कर्मचाºयांना सोबत घेत सापळा रचत ही कारवाई केली. व ही कारवाई सुरू असतांना काही ट्रॅक्टर चालकांनी नदी शेजारील डोंगराळ जंगलातून ट्रॅक्टरसह पळ काढला. यादरम्यान तहसीलदार यांनी सोबत असलेल्या पथकास सोबत घेऊन त्यांचा फिल्मी स्टाईलने पळत पाठलाग केला. व काही ट्रॅक्टर जप्त केले.  या  सर्व ट्रॅक्टरांचा पंचनामा करण्यात आला. यांनी केली कारवाईतहसीलदार किशोर कदम, मंडळधिकारी सी़ यू़ पाटील, व्ही़ बी़ पाटील, आऱ डी़ देवरे, आऱ बी़ कुमावत, तलाठी दीपक महाजन, एम़ व्ही़ अहिरराव, डी़ पी़ ठाकरे, भोई, भैरट, महेंद्र पाटील , व्ही़ बी अहिरराव यांनी कारवाई केली़पोलिसांसह पथकही तैनातया कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. तसेच जास्तीत जास्त अवैध वाळू वाहतूक करणाºयांवर कारवाई करता यावी याकरिता तहसील कार्यालयाच्यावतीने पथक तयार करण्यात आले होते.चोरी थांबविण्याची गरजनदी पात्रातून मोठ्या प्रमाणात होणारी वाळूची चोरी वेळीच थांबविण्याची आवश्यकता आहे़ जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांनी याकडे स्वत: लक्ष देवून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलायला हवी़ हे ट्रॅक्टर केले जप्तया कारवाईत विजय पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर एमएच १८ एन ८५२६, नरेंद्र कुलकर्णी यांचे दोन ट्रॅक्टर एमएच १८ - ७७३३ आणि एमएच १८ - ७६१९, युवराज खताळ यांचे दोन ट्रॅक्टर एमएच १८ झेड ३४६ आणि २९२५, देवराम माळी एमएच १८ - झेड - ७३८८, तसेच राजेंद्र मालजी पाटील यांच्या मालिकेचे मुरुमने भरलेला एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला़तहसिलदारांनी चालविले स्वत: ट्रॅक्टरही कारवाई सुरु असतांना नदीतील खोºयांमध्ये काही ट्रॅक्टर लपवून चालकांनी पळ काढला होता. परंतु चार ते पाच किमी अंतरावर हे ट्रॅक्टर लपविण्यात आले असल्याने या वाहनांना चालविण्यासाठी चालक उपलब्ध होत नव्हते. यावेळी तहसीलदार कदम यांनी स्वत:च ट्रॅक्टर चालवत नदीतून बाहेर काढून आणले व पंचनामा केला. यावेळी गावातील व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

टॅग्स :Dhuleधुळे