शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 11:42 IST

जिल्हा परिषद : हगणदरीमुक्त जिल्हा घोषित करूनही अनेकांकडे नाहीत शौचालये

ठळक मुद्देजिल्ह्यात १८ हजार २६९ कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतरदेखील बहुतांश घरांमध्ये शौचालयही नसल्याचे चित्र आहे. आता अशा कुटुंबाचा शोध घेण्यात येणार आहे. त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. शिवाय सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाºयांनादेखील वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित केले जाणर आहे.या करिता आता नव्याने सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मात्र, आता ज्यांच्याकडे शौचालय आहे. त्यांना शासनाचे अनुदान मिळेल की नाही? हे अद्याप निश्चित नाही. याकरिता आता शौचालयांचे बांधकाम हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेने मे महिन्यात जिल्हा हगणदरीमुक्त घोषित केला आहे. मात्र,  प्रत्यक्षात बहुतांश कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे  समोर आले होते.  दरम्यान, आता महाराष्ट्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागानेच २०१२ मध्ये शौचालयाच्या बेसलाईन सर्वेक्षणात न आलेले आणि आता शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण सुरु करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षणास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१२ मध्ये शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शौचलय असलेल्या आणि नसलेल्या कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली. त्यात २ लाख ६४ हजार १८२ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले. प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे; यासाठी शासनाने प्रोत्साहनासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान देऊ केले. सुरुवातीच्या काळात एक लाख ९२ हजार ८५ शौचालयांचे, २०१७-१८ वर्षात सर्वाधिक एक लाख २५ हजार ३० शौचालयांचे बांधकाम करीत ३१ मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण झाले होते. 

सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे़  या कुटुंबांनाही वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मात्र,  त्यांना शासनाकडून अनुदान मिळेल की नाही? याविषयी अद्याप शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. शौचालयाचा नियमित वापर वाढावा यासाठी जनजागृती केली जाणार आहे.- मधुकर वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे