शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण व महामार्गाचे चौपदरीकरण संथगतीने

By admin | Updated: May 27, 2017 11:12 IST

केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने या काळातील कामकाजाचा घेतलेला आढावा.

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.28 : केंद्रातील भाजपा आघाडी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण झाले. तीन वर्षाच्या कार्यकाळात महामार्गाच्या चौपदरीकरणासह जिल्ह्यातील अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होतील, मार्गी लागतील,  अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सुरत-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष सुरू झाले, असले तरी ते अतिशय संथगतीने सुरू आहे. तर धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 चे चौपदरीकरण भूसंपादनाअभावीच रखडले आहे. ते कधी सुरू होते, याचीच प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांच्या भूमिपूजनासाठी येथे आले असता भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांत मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार या बहुप्रतिक्षित व महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असून हा रेल्वे मार्ग कधी एकदा साकार होतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना कधी साकारणार?   
तापी नदीवरील प्रकाशा मध्यम प्रकल्पातून लिफ्टने पाणी उचलून बुराई नदीत टाकल्यास वाया जाणा:या पाण्यातून अनेक प्रकल्प भरता येणार आहेत. त्यात बुराई नदीवरील बुराई, वाडीशेवाडे प्रकल्प, अमरावती नदीवरील मालपूर मध्यम प्रकल्प व नंदुरबार तालुक्यातील बंधारे या प्रकाशा-बुराई  योजनेतून भरता येणार आहेत. मात्र सदर योजनेचे काम गेल्या सात-आठ वर्षापासून  अत्यंत संथ गतीने सुरू आहे. 
या योजनेसाठी यंदा फारच थोडय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कामाला  गती देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करणे गरजेचे ठरले आहे. कारण येत्या एक-दीड वर्षात ही योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे नंदुरबार व धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. तसेच बुराई व अमरावती नद्या बारमाही होऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही कायमचा निकाली निघणार आहे.
पांझराकान कारखान्यासंदर्भात शेतकरी हिताचा निर्णय घेणे आवश्यक   
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचा पांझराकान साखर कारखाना बंद अवस्थेत आहेत. गेल्या वर्षापासून हीच स्थिती कायम आहे. या कारखान्या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे या तालुक्याचे भूमिपूत्र आहेत. त्यांनी निवडणूक काळात पांझराकान साखर कारखाना सुरू करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांनी हा कारखाना सुरू करण्याकडे लक्ष द्यावे, ही येथील शेतक:यांची भावना आहे. या प्रकल्पावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहेत. तालुक्यात धरणे तुडूंब भरले आहेत. चांगली कसदार शेती आहे. परंतु कारखाना बंद असल्याने शेतक:यांना उसाचे पीक घेता येत नाही. कांद्यासह इतर पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडला आहे. कारखाना बंद झाल्याने तालुक्याचा विकास खुंटला आहे. केंद्रीय मंत्री डॉ.भामरे यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी जेवढा पाठपुरावा केला, तेवढाच या कारखान्यासाठीही करावा, अशी आस तालुकावासीय बाळगून आहेत. 
थकीत कर्जामुळे बंद असलेल्या ‘शिसाका’स निधी द्या 
गेल्या चार वर्षापासून येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना थकीत कर्जामुळे बंद अवस्थेत आह़े त्यामुळे शेतक:यांचे अतोनात हाल होत आहेत़ यासाठी लोकप्रतिनिधिींनी अनेकदा आवाज उठवून देखील याकडे दुर्लक्ष केले गेले आह़े हा कारखाना मल्टीस्टेट असल्यामुळे याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देवून कारखाना सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करू देणे आवश्यक आह़े
सुलवाडे बॅरेजचे पाणी शेतक:यांना कधी मिळणार?
कोटय़वधी रूपये खर्च करून सुलवाडे बॅरेज बांधून तापी नदीचे वाहणारे पाणी अडविण्यात आले आह़े परंतु हे अडविलेले पाणी नदीच्या आजूबाजूला असलेल्या शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील शेतक:यांना शेतीसाठी वापरण्यास बंदी असल्यामुळे त्याचा लाभ होत नाही़ हाताशी सुपीक जमीन असतांनाही डोळ्यादेखत लाखो क्युसेस पाणी तापी पात्रात असतांना देखील ते न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आह़े
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी अखेरच्या टप्प्यात नद्यांचे सर्वेक्षण 
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या संदर्भात दिवसेंदिवस प्रगती होत असून सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. मार्गावरील तीन मोठय़ा नद्यांवर पूल बांधण्यासाठी लवकरच  सव्र्हे केला जाणार आहे, अशी माहिती संघर्ष समिती प्रमुख मनोज मराठे यांना प्रमुख सव्र्हेअर दीपक पाटील यांनी दिली. वाढत्या तापमानामुळे या कामावर परिणाम झाला आहे. परंतु लवकरच मालेगावजवळील गिरणा, शिरपूरजवळ तापी व मध्यप्रदेश राज्यातील नर्मदा या नद्यांचा सव्र्हे केला जाणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक्षात हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर जिल्ह्याचा  विकास झपाटय़ाने होणार  आहे. 
‘वाडीशेवाडी’च्या कालव्यांना गती द्या 
शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी मध्यम प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम रेंगाळले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी लाभक्षेत्रात पाणी वितरणासाठी आवश्यक असलेले कालवे तसेच पाटचा:यांकरीता भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्यास गती देण्याची गरज आहे.हे काम कधी पूर्ण होते, याकडे आता शेतक:यांचे लक्ष लागले आहे.