शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:27 IST

एसीबी : नाशिकच्या पथकाची कारवाई

ठळक मुद्देनाशिकच्या पथकाची धुळ्यात कारवाई४ हजाराची लाचेची मागणी भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बियर शॉपीच्या नूतनीकरणासाठी धुळ्यातील कामकाज पूर्ण करून देण्याच्या मागणीसाठी चार हजारांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक धनराज मून व वरिष्ठ लिपिक रविंद्र अहिरे यांना गुरूवारी दुपारी कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक धनराज महादेवराव मून (५८, रा़ मुंदडा नगर, गायत्री प्रोव्हीजन मागे, जळगाव) हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते़ मात्र, तत्पूर्वीच त्यांच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत़ मून यांच्या जळगावातील घराची झडती घेण्यात आली़ तर रविंद्र जगन्नाथ अहिरे (४३, रा़ नवजीवन हौसिंग सोसायटी,नकाणे रोड, देवपूर, धुळे) यांच्या घराचीही पथकाने सायंकाळी उशिरापर्यंत झडती घेतली़ मात्र, त्यात फारसे काही आढळले नसल्याचे सांगण्यात येत आहे़ नाशिकचे पथक धुळ्यातधुळ्यातील ५१ वर्षीय बियर बारच्या चालकाने या संदर्भात नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. अधीक्षक मून यांनी धुळे कार्यालयातील बियर शॉपी नूतनीकरणाचे कामकाज पूर्ण करून देण्यासाठी चार हजार लाचेची मागणी लिपिकाद्वारे केली होती़ तर तक्रारदाराने नाशिकमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वत: मून यांना जिजामाता हायस्कूलजवळील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई नाशिक एसीबीचे निरीक्षक प्रभाकर निकम व सहकाºयांनी केली. धुळ्यातील पथकाने सहकार्य केले़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस