शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

संडे हटके बातमी  : लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरत नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:36 IST

दावा खोटा । केवळ अंधश्रध्दा असल्याचा प्रकार

वसंत कुलकर्णी । धुळे : एखाद्या घटनेविषयी कुणी काही अफवा पसरवली की ती घटना वाºयासारखी पसरते आणि त्या अंधश्रद्धेचे अनुकरण सुरु होत. अशीच अफवा म्हणजे रंगीत पाणी भरून बाटली घर अथवा कार्यालयापुढे ठेवल्यास कुत्रे, पक्षी व प्राणी दारात येत नाहीत म्हणून शहरात ठिकठिकाणी लाल पिवळ्या रंगाचे पाणी भरुन ठेवलेल्या बाटल्या सध्या अनेक घरांच्या, इमारतींचा बाहेर व चारचाकी वाहनांच्या टपावर दिसतात.    मात्र या अशा उपायाला व घटनेला कोणताही शास्त्रीय आधार नसून निव्वळ गैरसमज म्हणून अनेक जन निव्वळ ऐकीव माहितीवर असे उपाय करत आहेत. या बाटलीत लाल पाणी भरून ठेवल्यास कुत्री व पक्षी त्या परिसरात विष्ठा करत नाहीत म्हणून हा उपाय करत असल्याचं अनेकांचे म्हणणे आहे. मात्र यात कोणताही शास्त्रीय आधार नाही. दोन वर्षापूर्वी देखील अशीच बालकत्रीची अफवा जिल्ह्यासह खान्देशात पसरली होती. की रात्री अंधारात कुणी तरी येते व महिलांचे केस कापून नेते़ उपाय म्हणून लाल कुंकू किंवा रंग पारदर्शक बाटलीत भरून दारा बाहेर ठेवल्यास घराचे संरक्षण होते म्हणून त्या वेळी देखील घरा पुढे रंगीत पाणी असलेल्या बाटल्या पहायला मिळत होत्या़ या अफवेचा देखील अनेकांनी धसका घेतला होता. ग्रामीण भागात तर काठी घेऊन रात्री जागता पहारा दिला जात होता. मात्र हे प्रकरण देखील अंधश्रध्दा ठरले होते. या अशा अफवा सोशल मिडीयाच्या गैरवापराचे उदाहरण म्हणावे लागेल. कुणी ही या अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे़ याकामी आता सर्वसामान्य नागरीकांनी अंधश्रध्देपासून दूर होण्याची गरज आहे़ रंगीत पाणी भरुन ठेवणे हा एक प्रकारचा गैरसमज  नागरिकांमध्ये वाढत आहे़ ही निव्वळ अंधश्रद्धाच आहे. नागरिकांनी अशा अंधश्रध्दांना बळी पडू नये़ त्यासाठी नागरीकांनी सजग असावे़  - डॉ.सुरेश बिºहाडे,धुळे जिल्हा कार्याध्यक्ष अंनिसतसे पाहता कुत्र्यांना रंग आंधळेपणा असतो़ ते पाण्यातील रंग ओळखू शकत नाहीत़ मात्र, बाटली विषयी अप्रूप म्हणून ते लांब पळत असावेत, असा अंदाज आहे़ रंगीत पाण्याच्या बाटलीच्या उपायात वैज्ञानिक असा काही अर्थ नाही.-डॉ. संदीप देवरे,        पशुधन अधिकारी धुळे  

टॅग्स :Dhuleधुळे