लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील ८८ रूग्णांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चितोड रोड परिसरातील ५९ व जुने धुळे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.रविवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ५२ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिंदखेडा तालुक्यातील सात, धुळे तालुक्यातील १०, शिरपूर तालुक्यातील दोन, व साक्री तालुक्यातील १७ रूग्णांना बाधा झाली आहे़ जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ४३०५ इतकी झाली आहे.
रविवारी ८८ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 21:42 IST