शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहीर अनुदानासाठी शेतकरी कुटुंबाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:36 IST

कुटुंबातील सदस्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

मालपूर, ता.शिंदखेडा : सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी शेतात खोदकाम सुरू असलेल्या विहिरीजवळच येथील शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दोंडाईचा व नंदुरबार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कुटुंबातील सदस्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांना त्यांच्या गट क्र. ८३/१/३ मध्ये १.३५ आर क्षेत्र असलेल्या शेतात सिंचन विहीर मंजूर झाली असून शिंदखेडा पंचायत समितीच्या अभियंत्याकडून आखणी करून खोदकामही झाले आहे. सर्व अटींचे पालन करूनही कोणतेही अनुदान बॅँक खात्यात जमा न झाल्याने या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यापूर्वीही १ एप्रिल रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्नीसह अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्यासतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. मात्र त्यानंतरही न्याय न मिळाल्याने त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले.मोयाणे शिवार हे नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जितेंद्र जाधव, हवालदार संजय मोरे, बापू बागुल, विजय सोनवणे तसेच महिला पोलीस नाईक सुमन पाडवी व दोंडाईचा पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल प्रमोद चौधरी, कॉन्स्टेबल योगेश पाटील, मोहन पाटील, वैंदाणेचे पोलीस पाटील जगदीश पाटील हे सर्व शेतकरी धनगर यांच्या शेतातील विहिरीजवळ ठाण मांडून बसले होते.धनगर हे पत्नी योगिताबाई धनगर, मुलगा भूषण धनगर व निखिल धनगर यांच्यासह सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहचले त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पोलिसांकडे कोणतेही वाहन नसल्याने सुमारे तासभर हे कुटुंब रस्त्यावर पडून उलट्या करत होते. त्यामुळे त्यांचे कपडे रक्ताने माखले. घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. पोलिसांचे वाहन तासाभरानंतर पोहचले. त्यावेळी पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेऊन वाहनाने नंदुरबार येथे नेले. तेथील जिल्हा रूग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे