शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

ऊसाला २७०० रुपयांचा दर जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:38 IST

शिरपूर : स्थानिक कारखाना बंद, अन्य साखर कारखान्यामुळे शेतकरी होरपळला

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ काही परिसरात या हंगामातील ऊसतोडणी सुरू झाली असून २२५० ते २७०० रूपयापर्यंत भाव देण्याचे जाहिर केले आहे़ सद्यस्थितीत ऊसतोड व वाहतुकीचा सर्व खर्च कारखाना प्रशासन करीत आहे़ गेल्या हंगामात चाळीसगांव येथील बेलगंगा कारखान्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट उशिरा दिल्यामुळे शेतकरी चांगलाच होरपळला होता. यंदा अद्याप त्या कारखान्याच्या ऊसतोड टोळ्या दाखल झालेल्या नाहीत़गेल्या ८ वर्षापासून शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद आहे़ बंद काळातही तालुक्यात ऊस लागवड सुरूच आहे़ अद्यापही तालुक्यात ४ ते ५ हजार एकर क्षेत्रात ऊस उभा आहे़ गेल्यावर्षी ऊसतोडणीसाठी मजुराअभावी शेतकरी मेटाकुटीस आला होता़ तालुक्यातील ऊस पुष्पदंतेश्वर, फैजपूर, चोपडा, कन्नड, द्वारकाधीश तसेच खाजगी कानसरींनी नेला होता़ सर्वच कारखान्यांनी वेगवेगळा भाव दिला होता़ गतवर्षी चाळीसगांव येथील बेलगंगा कारखान्याने १९०० ते २ हजार रूपये भाव देवून ऊसतोड केली होती़ मात्र ऊसाचे पेमेंटकरीता शेतकºयांना तब्बल ३-४ महिने थांबावे लागले होते़ काही शेतकरी त्या कारखान्यापर्यंत पोहचल्यानंतर ऊसाचे पेमेंट मिळाले होते़ अद्यापही काही शेतकºयांचे पेमेंट बाकी असल्याचे सांगण्यात आले़गेल्या आठवड्यात तालुक्यात ऊसतोडणीला सुरूवात झाली़ कन्नड येथील कारखान्याने २४०० रूपये भाव जाहिर करून २१ दिवसानंतर पेमेंट देण्याच्या बोलीवर ऊसतोड स्वखर्चाने करुन ते वाहून नेत आहेत़ द्वारकाधीश कारखाने २५००, पुष्पदंतेश्वर कारखान्याने २३४० रूपये भाव सांगून ऊसतोड करण्यासाठी टोळ्या पाठवून वाहून नेत आहेत़ बडवानी येथील कारखान्याने २२५० रूपये देण्याचे जाहिर केले आहे, मात्र शेतकºयांनी २३५० च्या वर भाव मिळेल तरच ऊस देण्याचे सांगत आहे़ भाव निश्चित न झाल्यामुळे अद्याप त्या कारखान्याने ऊसतोड सुरू केलेली नाही़ नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी सुध्दा या भागातील शेतकºयांशी संपर्क साधून ऊस घेण्याचे सांगत आहेत़ ते देखील २६०० ते २७०० रूपये भाव देण्याचे सांगत आहेत, मात्र ते ठराविक शेतकºयांचाच ऊस घेवून जातात़ त्यामुळे गतवर्षी शेतकºयांचे हाल होवून नुकसान देखील झाले आहे़ त्यामुळे २-३ वर्षापर्यंत ऊस घेण्याचा करार केला तरच शेतकरी या कारखान्याला ऊस देणार आहे़शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर येथील दत्तकृपा कारखान्याने देखील भाव जाहिर न करता ऊसतोड करून वाहून नेत आहे़ परिसरातील शेतकºयांना अन्य कारखाना जो भाव देईल तो भाव देण्याचे आश्वासन दिले आहे़ त्यामुळे या कारखान्याने २-३ दिवसापासून तालुक्यात ऊसतोड सुरू केली आहे़गेल्यावर्षी ऊसतोडणीच्या शेवटी-शेवटी शेतकºयांनाच खाजगी टोळी टाकून ऊसतोडणी करून घ्यावी लागली आहे़ त्यापोटी टनामागे मजूर शेतकºयांकडून प्रतिटन ४०० रूपये मोजून घेतले आहेत़ तसेच जेवनाचा डबासह ट्रकचालकांना सुध्दा वेगळा पैसा द्यावा लागला आहे़होळनांथे, मांजरोद, भोरटेक परिसरातील शेतकरी द्वारकाधीश व कन्नड कारखान्याला ऊस देत आहे़ करवंद व सावळदे परिसरातील शेतकरी पुष्पदंतेश्वर व द्वारकाधीशला ऊस देत आहेत़ तरडी, हिसाळे परिसरातील शेतकरी शहादा येथील पुष्पदंतेश्वर कारखान्याला ऊस देत आहेत़स्थानिक साखर कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत आहे़ त्यामुळे लवकर ऊस तोडणीसाठी खाजगी टोळ्या उभारून जो भाव मिळेल त्या भावात ऊस तोडणी करीत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे