शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:02 IST

धनुर रस्त्याची दुरवस्था : दलदलीतून वाहन बाहेर काढण्यासाठी चालकांची कसरत

कापडणे : धुळे तालुक्यातील धनुर गावांमधील मुख्य रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. या रस्त्याजवळील रहिवाशांच्या घरांचे सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने येथे चिखलयुक्त दलदल निर्माण झाली आहे. सदर रस्ता दुरुस्ती कामासाठी धनुर ग्रामपंचायतीने पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.धनुर येथील शिवाजीनगर जवळील जिल्हा परिषद शाळा ते ग्रामपंचायत कार्यालय चौकापर्यंत तब्बल एक किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून परिसरातील घरांचे सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलयुक्त दलदल निर्माण झाली आहे.यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. विशेषत: लहान शालेय विद्यार्थ्यांना दररोज सकाळ-संध्याकाळ मोठी कसरत करीत या दलदलीतून मार्ग काढावा लागत आहे. अनेकदा येथे शाळकरी विद्यार्थ्यांचे व अन्य वाहने चिखलात फसतात. वाहन चिखलातून बाहेर काढण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना वाहनातून खाली चिखलात उतरवावे लागते. त्यानंतर चिखलातून वाहन बाहेर काढण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागते. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी धनुर येथील उपसरपंच विजय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव हिरामण कोळी, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज पाटील, योगेश भामरे, विजय भामरे, भटू खैरनार, कैलास शिंदे, चेतन शिंदे, नंदू सोनार, सुयोग पवार यांच्यासह शिवाजीनगरमधील रहिवासी पवन पाटील, सावकार पाटील, सतीश शिंदे, बबलू पाटील, गणेश शिंदे, विनोद पाटील, बबलू बोरसे, संदीप पाटील आदी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे