शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या नियोजनाकडे प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:00 IST

महादेव दोंदवाडा : विकास योजना आपल्या दारी कार्यक्रमात भूपेशभाई पटेल

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : संपुर्ण तालुक्याच्या विकासाकडे लक्ष असून त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरु आहेत. महादेव दोंदवाडा गावाला आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे सर्व प्रयत्न सुरु असून आहेत. गावातील शिक्षणासाठी खास प्रयत्नशील आहोत. सर्व मुलभूत सुविधा दिल्या जातील. पाण्याचे नियोजनाकडे लक्ष दिले जाईल असे प्रतिपादन शिरपूर प्रियदर्शिनी सुतगिरणीचे चेअरमन  भूपेशभाई पटेल यांनी विकास योजना आपल्या दारी अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले़महादेव दोंदवाडा येथे आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन, तालुका युवक काँग्रेस, शंकरा आय हॉस्पीटल यांच्यावतीने ७८ वे आरोग्य शिबीर तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन करण्यात आले़यावेळी आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन तपनभाई पटेल, माजी जि.प. उपाध्यक्ष के.डी.पाटील, पं.स. उपसभापती संजय पाटील, माजी सरपंच बुधा माला पावरा, सरपंच कमलबाई पावरा, माजी सरपंच मोवाशा पावरा, उपसरपंच किसन पावरा, डॉ.विजय राजपूत, माजी पं.स.सदस्य गयास खाटीक, अनारसिंग जाधव, अनिल पाटील, रविंद्र कोळी, दिपक पावरा, नकला पावरा, जगतराव पावरा, संगिता पावरा, पमाबाई पावरा, मेलवीबाई पावरा, पेरवीबाई पावरा, युवक काँग्रेस शाखाध्यक्ष किसन पावरा, सोनू पावरा, सुक्राम पावरा, नाना पावरा, छोटूराम पावरा, सुनिल पावरा, सुक्राम भिल, बागल्या पावरा, रविंद्र पावरा, दरबारसिंग जाधव, प्रदीप पावरा, सुनिल जैन आदी उपस्थित होते.आमदार काशीराम पावरा म्हणाले, तालुक्यातील कोणीही नागरीक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही असे नियोजनबद्ध काम आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पं.स.उपसभापती संजय पाटील म्हणाले, पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात आवश्यक ती सर्व कामे सुरु आहेत. विविध योजनांचा लाभ देण्याचे काम केले जात आहे. या शिबीरात २४५ जणांची डोळे तपासणी करण्यात आली. ३३ जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. अनेक जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. सुत्रसंचालन साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भैरव राजपूत, महेश पाठक, संदीप शिरसाठ, नईम इनामदार, विशाल पाटील, अनिल सोनवणे, विकास योजना आपल्या दारी अभियानचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले़

टॅग्स :Dhuleधुळे