लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : आदिवासी बांधवांची दिवाळी म्हणून ओळखल्या जाणारा भोंगºया उत्सव व होलिकोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागले असून सातपुड्यांच्या पाड्यांवर ढोलचे निनाद ऐकू येऊ लागले आहेत़ सातपुडा परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे़सध्याच्या डीजिटल युगात देखील सातपुड्याच्या कुशीत अजूनही पारंपारिक परंपरा, चालीरिती टिकून आहेत़ हा वारसा आदिवासी बांधवांनी टिकून ठेवला आहे़ आपल्या मनातील वाईट विचार तसेच वाईट प्रवृत्तीला दहन करण्याचा संदेश देणाºया होळीचे आदिवासी बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे़ फाल्गुनी पौर्णिमेपासून सुरू होणारा होलिकोत्सव साजरा करण्यासाठी गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशात विखुरलेला पावरा, गावीत, मावची, भिल्ल असे विविध समाज बांधव या उत्सवानिमित्त एकत्र येत असतात़यंदाही सातपुड्याच्या परिसरात तसेच दºया-खोºयातील, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील मजुरीसाठी स्थलांतरीत झालेले समाजबांधव उत्सवासाठी गावाकडे परतू लागले आहेत़ त्यामुळे काहीअंशी ओस पडलेली गावे आता पुन्हा चैतन्याने बहरत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे़येत्या १ मार्चपासून तालुक्यात भोंगºया उत्सवाला सुरूवात होत आहे़ होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी गाव तसेच पाड्यातील सर्व आदिवासी स्त्री-पुरूष पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करीत सहकुटूंब उत्सवात सहभाग होत असतात़यात गावपाटील व काही जोडप्यांच्याहस्ते विविधत होळीची पूजा करण्यात येते़ त्यानंतर त्यांच्या हस्ते होळी पेटविण्यात येते़ त्यानंतर होळी भोवती आदिवासी बांधवांकडून नृत्य सादर केले जाते़ यावेळी विविध प्रकारचे सोंग घेवून नृत्य सादर करण्यात येते़ तसेच समाजबांधव नवसपूर्तीसाठी सुध्दा सोंग घेत नृत्य करतात़होलिकोत्सवानिमित्त समाज बांधवांमध्ये प्रथेनुसार फाग मागण्याची पध्दत देखील आहे़ दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात फाग अर्थात देणगी मागण्याची प्रथा आजही कामय आहे़ महिला व पुरूष गाव-पाड्यांमध्ये फाग मागतांना दिसून येत असतात़होलिकोत्सव साजरा करण्याची तयारी अंतीम टप्प्यात आली असून जय्यत तयारी सुरु आहे. पारंपारिक वाद्ये, ढोल, दागिने, पारंपारिक आभूषणे, शस्त्रे आदींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे़
१ मार्चपासून भोंगऱ्या उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:10 IST