लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : स्टार्टअप उपक्रम युवा उद्योजकांसाठी योग्य व्यासपीठ असून त्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासही साध्य होणार आहे. नवीन उद्योग सुरु करतांना येणारी आव्हाने आणि छोट्या शहरांमध्ये स्टार्टअप कंपन्यांचे भविष्य यांची ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे़ या उपक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग वाढवावा, असे प्रतिपादन युनायटेड स्टेट्सचे एम.अॅण्ड ए. इंटरनॅशनल कॅपीटल पार्टनर्स एल.एल.सी.चे संचालक हर्षल विभांडीक यांनी केले़येथील आर.सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय.एम.आर.डी. परिसंस्थेत ‘यशस्वी उद्योजकता विकास’ या विषयावर हर्षल विभांडीक, नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी दिपक ठाकणे, युवा उद्योजक योगेश मिरगे, रोहित मराठे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, एम.सी.ए. विभाग प्रमुख प्रा.मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभाग प्रमुख डॉ.मनोज पटेल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसाय सुरु करण्याचे कौशल्य आत्मसात करुन सरकारच्या विविध योजनांद्वारे स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.युवा उद्योजक दिपक ठाकणे यांनी महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रिनरशीप डेव्हल्पमेंट उपक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना व शासनाकडून मिळणाºया विविध अनुदानांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.परिसंस्थेचे माजी विद्यार्थी व युवा उद्योजक योगेश मिरगे यांनी त्यांच्या स्टार्टअप यशराज कंपनी शहादा या उद्योगाची वाटचाल व माहिती स्पष्ट केली. त्यात त्यांनी उद्योग उभारतानांचे अनुभव, आव्हाने आणि मार्ग या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील म्हणाल्या, व्यवस्थापन आत्मकेंद्री ठेवल्यास व्यवसायात झपाटयाने प्रगती साधता येते. तसेच सर्वांनी भविष्यातील संधीविषयी सजगता बाळगावी, असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.योगेश सेठिया, प्रा.सचिन सुराणा, प्रा.अमर गौर, प्रा.केदार आपटे, प्रा.महेश भावसार, प्रा.मानसी वैद्य, प्रा.प्रियंका भंडारी, प्रा.दिनेश बोरसे, प्रा.अमुल तांबोळी, प्रा.लक्ष्मीकांत शर्मा प्रा.सुफियान बागवान, प्रा.प्रियंका सैंदाणे, प्रा.स्नेहा सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
‘स्टार्टअप’ उपक्रम युवा उद्योजकांसाठी व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:22 IST