शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात जिल्हा प्रशासनाकडून उत्पन्नाच्या दाखल्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:28 IST

जिल्हा प्रशासन : विद्यार्थी, नागरिकांना दिलासा; उर्वरीत दाखले वाटप बंदच

ठळक मुद्देउत्पन्नाचा दाखला गरजू व्यक्ती किवा विद्यार्थ्यांना द्यावा, असे शासन निर्देश केवळ गरजू व्यक्ती व विद्यार्थ्यांनाच उत्पन्नाचा दाखला वितरण सुरू अनेक तलाठी अजुनही उत्पन्नाचा दाखला वितरीत करत नसल्याची परिस्थिती

आॅनलाईन लोकमतधुळे,दि.२० : जिल्ह्यातील काही तलाठ्यांनी उत्पन्नाचा दाखला वितरणास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची उत्पन्नाच्या दाखल्यांअभावी होणारी गैरसाय थांबली आहे. उत्पन्नाचा दाखला देणे सुरू झाले असले, तरीही इतर १८ प्रकारचे दाखले वितरण अद्याप बंदच आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली आहे. जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांच्याकडून देण्यात येणारी विविध प्रकारचे १९ दाखले वितरण २ आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले होते.  परिणामी, नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक दाखलेही विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. तलाठी महासंघाने घेतलेल्या दाखले बंदच्या निर्णयाविरोधात शहरातील काही विद्यार्थी संघटनांनी आवाजही उठविला होता. तरीही दाखले बंद ठेवण्याचा निर्णय तलाठ्यांनी कायम ठेवला होता. 

हे दाखले वितरण बंदच वारसा चौकशी अहवाल, अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे प्रमाणपत्र, गृह चौकशी अहवाल, विद्युत पोल अंतराचा दाखला, तलाठी शब्द वापरून कोणत्या ही विभागाने मागितलेले दाखले, विधवा, परितक्त्या असलेले दाखले, जात-जमात शिफारस दाखला, शेतीचा नकाशा, सिंचन विहिर, स्थळ दर्शक नकाशा, रहिवासी दाखले, स्वयंघोषणापत्र, भूमिहीन असल्याचा दाखला, शेतकरी असणे, हयातीचा दाखला, पाचशे मीटर आत विहिरीचा दाखला, वंशावळ दाखला, निराधार असल्याचा दाखला आदी दाखले वितरण तलाठ्यांनी बंदच ठेवले आहेत. 

टॅग्स :Governmentसरकार