लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात एकाचवेळी नगाव बारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसवर दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. दगडफेकीनंतर जमाव तेथून पसार झाला. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचनाही केल्या़ शहरातील पारोळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ रस्त्यावर जळगावकडून येणाºया एम.एच.१४ बीटी३९११ क्रमांकाच्या जळगाव - धुळे बसवर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एका जमावाकडून अचानक दगडफेक झाली. दगडफेकीत बसच्या चालक कॅबीनची काच फुटली. दगड काच तोडून बसमध्ये आल्याने प्रवासी घाबरले. प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबविल्याने पुढील अपघात टळला. बस थांबते तो पर्यंत दगडफेक करणाºयांचा जमाव तेथून पळाला. घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या आझाद नगर पोलीस स्टेशनवरील फौजफाटा पोलीस निरीक्षक दत्ता पवारासह घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे परिसरात शांतता पसरली.दुसºया घटनेत नगाव बारी परिसरात मुंबई - आग्रारोडवर रात्री साडे आठ ते नऊ वाजेदरम्यान एम.एच.२० बीएल ०९२३ क्रमांकाच्या धुळे - शिंदखेडा बसवर मागून मोटारसायकलवर अचानक पुढे आलेल्या तीन युवकांनी बसवर दगड फेकला. त्यामुळे बसची पुढची काच फुटली. दगड फेकल्यानंतर ते युवक तेथून भरधाव वेगाने पसार झाले. घटनेनंतर देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद निकम हे घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीचे कारण समजले नाही. घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
धुळ्यात दोन ठिकाणी बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 22:50 IST
तणावपुर्ण शांतता, संवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त
धुळ्यात दोन ठिकाणी बसवर दगडफेक
ठळक मुद्देनगावबारीसह बाजार समिती परिसरात तणावबसेसचे नुकसान, प्रवाश्यांना बसस्थानकात सोडलेसंवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात