शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला वेग

By admin | Updated: March 24, 2017 00:12 IST

प्राथमिक शिक्षण विभाग : पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखले सादर करण्यास शिक्षकांची टाळाटाळ

धुळे : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सध्या वेग आला आहे. यासाठी २०१४ पर्यंतचे      शिक्षण विभागाकडे ७१४ अर्ज प्रलंबित आहेत. तर सद्य:स्थितीत जिल्ह्यामध्ये २५० पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने भरण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले   आहे.आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन व राज्यस्तरावरून प्रक्रिया झाली तर शिक्षकांचे काम आणखी हलके होणार आहे. तसेच यामध्ये पारदर्शकता येण्यासही मदत होणार आहे.बिंदुनामावलीचे काम मार्गीआंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने नुकताच शिक्षकांच्या बिंदुनामावलीचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामध्ये पेसा (आदिवासी क्षेत्र) व नॉन पेसा (बिगर आदिवासी क्षेत्र) क्षेत्राची स्वतंत्र बिंदुनामावली जाहीर करण्यात आली आहे.      पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखलेपेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याने पेसा क्षेत्रातील शिक्षकांचे रहिवासी दाखले शिक्षण विभागाने मागविले आहेत. यासंदर्भात ४ आॅक्टोबर २०१६ रोजी पत्र पाठवून माहिती मागविण्यात आली आहे. परंतु ही माहितीच शिक्षकांकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.यादी आॅनलाइन जाहीरआंतरजिल्हा बदलीने धुळ्यात येण्यास इच्छुक असणाºया ज्या शिक्षकांनी पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत, त्यांची यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. तसेच ही यादी जिल्हा परिषदेमध्येही चिटकविण्यात आली आहे. ६३ जणांचेच प्रमाणपत्र सादरपेसा (आदिवासी क्षेत्र) क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या शिक्षकांच्याच नियुक्त्या यापुढे करण्यात येणार आहेत. पेसा क्षेत्रातील २६० शिक्षकांपैकी आतापर्यंत फक्त ६३ शिक्षकांनीच रहिवासी प्रमाणपत्र सादर केले आहेत. त्यापैकी ५६ शिक्षकांचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात आहेत, तर सात जणांचे विहित नमुन्यात नाहीत. या शिक्षकांना २४ मार्चपर्यंत पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.१९५० पासूनचा दाखलाअनुसूचित जमातीच्या आंतरजिल्हा बदलीने येणाºया प्राथमिक शिक्षकांचे अनुसूचित क्षेत्रातील २६ जानेवारी १९५० पासूनचे रहिवासी असल्याबाबतचे दाखले सादर करणे अनिवार्य आहे. या पत्रानुसार आतापर्यंत फक्त ५६ जणांनीच दाखले सादर केले आहेत. हे दाखले येत नाहीत तोपर्यंत आदिवासी क्षेत्रातील कोण? व बिगर आदिवासी क्षेत्रातील कर्मचारी कोण? हे निश्चित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविता येत नाही.नंदुरबारचे शिक्षक जास्तआंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांमध्ये सर्वात जास्त शिक्षक हे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. एकूण ७१४ अर्जांपैकी ४५० अर्ज हे नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचे आहेत. शैक्षणिक वर्ष संपत आल्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यात येणाºया शिक्षकांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.२०१४ नंतरचा प्रश्न अनुत्तरित२०१४ पर्यंत आलेले अर्जच आतापर्यंत स्वीकारण्यात आले आहेत. २०१४ नंतर शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे २०१४ नंतरच्या शिक्षकांचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असल्याचे दिसून येत आहे.वर्षभरात एकही टप्पा झालेला नाहीगेल्या वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वेळा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये इतर जिल्ह्यातील २५० शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सामावून घेण्यात आले. मात्र यावर्षी वर्षभरात आंतरजिल्हा बदलीसाठी एकदाही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असणाºया शिक्षकांची सध्या घुसमट सुरू असलेली दिसून येत आहे.४डिसेंबरच्या दरम्यान आंतरजिल्हा बदलीसाठी संपूर्ण प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाने केली होती; परंतु पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील शिक्षकांची स्वतंत्र बिंदुनामावली (रोस्टर) करण्याच्या सूचना आल्यामुळे हे काम पुन्हा रखडले गेले. आता आदिवासी क्षेत्रात अनुसूचित जमातीच्याच शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.