शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

महापौर निवडीसाठी आज विशेष महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:41 IST

महापालिका : महापौर व उपमहापौर पदांसाठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता विशेष महासभा होणार आहे़ पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत महासभा होणार आहे़ महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत़महापालिका निवडणूकीत ५० जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहूमत मिळवले आहे़ त्यानंतर महापौर पदासाठी चंद्रकांत सोनार व उपमहापौर पदासाठी कल्याणी अंपळकर यांची नावे निश्चित केली आहेत़ नामनिर्देशन पत्र दखल करण्याच्या विहीत मुदतीत भाजपतर्फे महापौर पदासाठी चंद्रकांत मधुकर सोनार यांनी दोन अर्ज दाखल केले़ तर राष्ट्रवादीतर्फे मंगल अर्जुन चौधरी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत़ उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे कल्याणी सतीष अंपळकर यांनी एक व काँग्रेसतर्फे खान सद्दीन हुसेन रहेमतुल्लाह यांनी दोन अर्ज दाखल केले़ त्यामुळे महापौर व उपमहापौर या पदांसाठी एकूण ४ उमेदवारांनी ७ अर्ज दाखल केले आहेत़ महासभेच्या सुरूवातीला महापौर पदासाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल़ छाननीनंतर १५ मिनीटांचा  अवधी माघारीसाठी देण्यात येईल़ आवश्यकता भासल्यास हात उंचावून निवडणूक होईल़ उपमहापौर पदासाठी देखील त्याच पध्दतीने निवड प्रक्रिया राबविली जाईल़ औपचारिक निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांची भव्य मिरवणूक भाजपतर्फे काढली जाणार आहे़ त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे