शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धुळे जिल्ह्यात महिला मतदार वाढविण्यासाठी मार्चमध्ये विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:54 IST

जिल्हा निवडणूक शाखा : १ हजार पुरुषांमागे महिला मतदारांची संख्या ९३४; तफावत दूर करण्यासाठी घेणार जनजागृतीपर कार्यक्रम

ठळक मुद्देमहिला मतदार वाढविण्यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये असलेल्या निवडणूक शाखेत मतदार मार्गदर्शन कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे.या कक्षात अद्याप जिल्ह्यातील ज्या महिला मतदारांनी नोंदणी केलेली नाही. त्या महिलांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. मार्चमध्ये राबविण्यात येणाºया विशेष मोहीमेंतर्गत जिल्ह्यातील ८ महिला महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, निबंध स्पर्धा घेतल्या जाणार असून स्पर्धेत विशेष यश मिळविणाºया विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर पारितोषिकही दिले जाणार आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर शया शिबिरांमध्ये प्रांताधिकारी व तहसीलदार मार्गदर्शन करतील. तसे त्यांना जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  जिल्ह्याची विधानसभा मतदार यादी नुकतीच अद्ययावत झाली. त्यात १ हजार पुरुषांमागे महिला मतदारांची संख्या ही ९३४ इतकी आढळून आली. मतदार यादीतील ही तफावत दूर करून महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मार्च महिन्यात जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदार यादीत नाव नोंदणी करावी; याउद्देशाने जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम व महिला महाविद्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेंतर्गत मतदारांची नव्याने मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा नावांची वगळणी करण्यात आली. अद्ययावत झालेल्या यादीत जिल्ह्यात ८ लाख १० हजार ४७६ पुरुष तर ७ लाख ५६ हजार ६९५ स्त्री मतदार तर २० इतर मतदार आहेत. या मतदार यादीत एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही ९३४ असल्याची बाब समोर आली आहे. 

धुळे शहरात स्त्री मतदारांचे प्रमाण कमी जिल्ह्यात धुळे शहर विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या सर्वात कमी आहे. धुळे शहर विधानसभा मतदार संघाचा  विचार केला तर एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही ८८७ इतकी आहे. तर धुळे ग्रामीणमध्ये ९१७, साक्री ९३६, शिंदखेडा ९६५, शिरपूर ९६४ असे प्रमाण आहे. 

विविध विभागांच्या योगदानातून घेणार जनजागृतीपर कार्यक्रम ८ मार्चला महिला दिन आहे. हा दिवस विविध विभागांतर्फे साजरा केला जातो. त्यापार्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विविध विभागाच्या नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांनी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार महिला दिनानिमित्त ८ मार्चला जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांद्व्रारे मतदानाविषयी जनजागृती व नव्याने मतदार यादीत नोंदणी केलेल्या निवडक स्त्री मतदारांना ओळखपत्राचे वाटप केले जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रत्येक कार्यालयाकडे कोणती जबाबदारी राहील? हे देखील निश्चित करण्यात आले.

१० हजार महिला मतदार नोंदणीचे उद्दिष्ट जिल्हा निवडणूक शाखेतर्फे मार्च महिन्यात राबविण्यात येणाºया विशेष मोहीमेंतर्गत १० हजार महिलांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.