लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सोनगीर येथे दरोडा प्रकरणी सात संशयितांना जेरबंद करण्यात सोनगीर व नरडाणा पोलिसांना यश आले आहे़ याप्रकरणी १ कोटी ८ लाखांची रक्कम त्यांच्याकडून जप्त केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ सोनगीर येथे दरोडा पडल्यानंंतर तपास कामाला गती देण्यात आली होती़ मिळालेल्या माहितीच्या आधारावर ठाणे येथून चौघांना तर गुजरात राज्यातून तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले़ त्यांच्याकडून १ कोटी १ लाख ५ हजार रुपये रोख, एक गावठी पिस्तुल, ३ जिवंत काडतूस आणि कार असा एकूण १ कोटी ८ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़ याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सोनगीर पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़
सोनगीरचा दरोडा उघड, ७ संशयितांकडून १ कोटी ८ लाख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:27 IST
आरोपी वाढण्याची शक्यता : पोलीस अधीक्षक यांची माहिती
सोनगीरचा दरोडा उघड, ७ संशयितांकडून १ कोटी ८ लाख जप्त
ठळक मुद्देसोनगीरचा दरोडा उघड७ संशयित जेरबंदपोलीस अधीक्षकांची माहिती