धुळे : महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ७४४ शोषखड्डे केल्याचे दाखवून ९ लाख ९३ हजार ४०८ रूपये मजुरांच्या नावावर बॅँकेत वितरीत केले. याप्रकरणी सरपंच, तत्कालीन ग्रामसेवकासह पाचजणांविरूद्ध अपहार केल्याचा गुन्हा सोनगीर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी धुळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कपील नवलसिंग वाघ यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून सरपंच योगीता अविनाश महाजन, तत्कालीन ग्रामसेवक विलास सखाराम सूर्यवंशी, सुशील देवराम मोरे, पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राहूल सैंदाणे, तत्कालीन ग्रामरोजगार सेवक अरूण माणिक मोरे यांच्याविरूद्ध सोनगीर पोलीस स्टेशनला भादंवि ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करीत आहेत.
सोनगीर ग्रामपंचायतीत दहा लाखांचा अपहार; गुल्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:06 IST