शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धुळ्यात समता दिंडीतून दिला सामाजिक न्यायाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:45 IST

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन : मादक पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

ठळक मुद्देमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भंडारी होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एन. यू. पाटील, डॉ. के. डी. अरगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या समता दिंडीतून सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. दरम्यान, आंतरराष्टÑीय  मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मादक पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. राज्य शासनातर्फे  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकार कार्यालयापासून समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सहभागी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर रहा असे आवाहन केले. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, समाज कल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जितेंद्र वळवी आदी उपस्थित होते. दिंडीतून दिला प्रबोधनात्मक संदेश समता दिंडीला जिल्हाधिकारी रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी हिरवी झेंडी दाखविली. या दिंडीत विविध शाळेचे शिक्षक, शिक्षिका, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्टÑीय छात्रसैनेचे विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही दिंडी जिजामाता कन्या विद्यालय, मनपा, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमार्गे कमलाबाई कन्या विद्यालयाजवळ येऊन पोहचली. तेथे दिंडीचा समारोप झाला.  दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे