धुळे : लॉकडाऊनच्या काळातील भरमसाठ वीजबिल त्वरीत रद्द करावे या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे़ शुक्रवारी अधीक्षक अभियंता प्रकाश पौनीकर यांची भेट घेत मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला़लॉकडाऊनच्या काळातील एकत्रित बील नागरिकांना देताना ते वाढीव दराने दिले आहे़ त्यामुळे ते बिल रद्द करावे़ उर्जा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शंभर युनिटचे वीजबिल माफ व्हावे़ तीन महिन्यांचे एकत्रित बील न देता ते तीन महिन्यात विभागून द्यावे़ हे बील भरण्यासाठी चार महिन्यांची मुदत मिळावी़ त्यावर दंड लावण्यात येऊ नये़ लॉकडाऊन काळात व नंतर कोणत्या खासगी कंपनीने मीटर लिडींग घेतले त्याची माहिती मिळावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंत्यांना सादर करण्यात आले़ या मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़यावेळी अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करण्यात आली़ यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संघटक आनंद लोंढे, महासचिव किरण गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय सावकारे, उत्तर महाराष्ट्र संघटक भालचंद्र सोनगत, जिल्हाध्यक्ष अॅड़ विनोद सोनवणे, उत्तर महाराष्ट्र महासचिव जितू जगताप, उत्तर महाराष्ट्र खजिनदार मिलींद पंचभाई, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बबलू गायकवाड, शहराध्यक्ष इम्रान पठाण, ग्रामीण अध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा सचिव प्रशांत जगताप, शहर खजिनदार प्रविण पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश पाटील, शहर सचिव साबीर अन्सारी आदी उपस्थित होते़
तर १५ जुलैला महावितरणला टाळे ठोकू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 21:54 IST