शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सोनगिरात तीन मंदिरांमध्ये चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:43 IST

चोरीच्या प्रमाणात होतेय वाढ : गस्त वाढविण्याची नागरीकांनी होतेय मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील गावाच्या उत्तर दिशेला एकांतात असलेल्या तीन धार्मिक स्थळांवर   गुरूवारी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीच्या घटना घडल्या. त्यात हजारो रुपये किंमतीच्या मुद्देमालासह रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले. या मुळे भीतीचे वातावरण आहे. येथील तपोभूमी धाम प्रणामी मंदिरातील चांदीचे देव (मुकुट)  तसेच मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीतील कपाट फोडून ताट, तांब्या, आरत्या, नाणे चोरी केले व खोलीतील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त केला.  मंदिरातील दान पेटी मागच्या बाजूला मिळून आली. पेटी फोडून त्यातील काही रोख रक्कम असा हजारोंचा ऐवज चोरट्यांनी एकट्या तपोभूमी धाम मंदिरातून चोरून नेला. दरम्यान तपोभूमी धाममध्ये चोरी झाल्याची दोन वर्षातील ही चौथी घटना आहे. याठिकाणी या अगोदर देखील चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या बाजुलाच असलेल्या ठाकुरसिंह बाबा यांच्या मानव रुहानी केंद्राचा मुख्य दरवाजा तोडून या ठिकाणची    दानपेटीही चोरट्यांनी फोडली व काही रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान याच भागात असलेल्या आनंदवन संस्थांनच्या गुरूगोविंद मंदिराचा मुख्य लोखंडी दरवाजा तोडून मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी जवळच असलेल्या गोडविहिरीच्या मागील बाजूस काटेरी झुडपात नेऊन फोडल्या व त्यातील रक्कम चोरून नेली.  चोरट्यांनी मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाची केबल तोडून ते निकामी केल्याचे आढळून आले. तसेच जवळच असलेल्या मधूसुधन महाराज मंदिरात दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी ते अयशस्वी झाले. दरम्यान सकाळी चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटना स्थळाची पाहणी केली. सुरुवातीला गुरूगोविंद महाराज मंदिरात चोरी करून नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तपोभूमी धामकडे वळवला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. तपोभूमी धाम प्रणामी मंदिरात दोन वर्षात ही चौथ्यांदा तर दोन महिन्यात दुसºयांदा़ गेल्या एप्रिल महिन्यात याच प्रणामी मंदिरात व महामार्गालगत असलेल्या गॅस एजन्सीमध्ये चोरीची घटना घडली होती़ या परिसरातील मंदिरामध्ये तसेच कासार गल्लीतील श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात देखील तीन वेळा चोरी झाली आहे़ पेडकाई देवी मंदिरातही चोरट्यांची हातसफाईशिंदखेडा : तालुक्यातील साळवे गाव शिवारात असलेल्या पेडकाई देवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांने चोरुन नेल्याची घटना बुधवारी पहाटे १ ते सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली़ पेडकाई देवी मंदिरातील दानपेटी सळई अथवा कोणत्यातरी हत्याराने तोडून त्यातील रक्कम चोरुन नेण्यात आली आहे़ यात अंदाजे १ हजार ५०० रुपये असावेत असा अंदाज आहे़ याप्रकरणी मंदिराचे ट्रस्टी डाकोरसिंग चंद्रसिंग गिरासे (४१) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली़ त्यानुसार, बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ शिंदखेडा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी