शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धुळे एमआयडीसीत पिस्तुलचा धाक दाखवून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 13:13 IST

अवधान शिवार : तिजोरीतील १० लाख घेवून पोबारा

ठळक मुद्देअवधान एमआयडीसीमधील मध्यरात्रीची घटनाजबरीने लुटून नेले १० लाखाची रक्कमपोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अवधान एमआयडीसीमध्ये शनिवारी मध्यरात्री तिघांनी शेंगदाणा कंपनीत पिस्तुलचा धाक दाखविला़ भरजबरीने तिजोरीतील १० लाख रुपयांची रोकड घेवून पोबारा केला़ आरडा-ओरड करुनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ सकाळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी भेट दिली़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत अवधान एमआयडीसीमध्ये कानसिंग प्रेमसिंग राजपुरोहित (रा़ गुडानाल ता़ शिवाना जि़ बाडमेर) यांच्या मालकीचे भवानी ट्रेडर्स आहे़ या कंपनीमार्फत शेंगा खरेदी करुन त्याचे शेंगदाणे बनवून विक्री करण्याचे काम चालते़ या कंपनीत सुजानसिंग वगताजी राजपुरोहित हे मॅनेजर आहेत़ त्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार शनिवारी मध्यरात्री कंपनीत झोपलेले असताना २० ते २५ वयोगटातील तीन जण आले़ त्यांनी कंपनीचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला़ दरवाजा कोण वाजवितो आहे, हे पाहण्यासाठी खिडकी खोलून पाहिले असता तिघांपैकी एकाने पिस्तुलचा धाक दाखवित दरवाजा उघडण्याचे सांगितले़ दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असता थेट गोळीही झाडण्यात आली़ दरवाजा तोडून या तिघांनी आत प्रवेश केला़ तिजोरीत ठेवलेले १० लाख रुपयांची रोकड घेवून पोबारा केला़ त्यांच्यातील एकाने मारहाण देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील करीत आहेत़