शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात गोळीबार करून डेअरीतून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:00 IST

वर्दळीच्या मालेगाव रस्त्यावरील रात्रीचा थरार  

ठळक मुद्देदुचाकीवरून आलेल्या तिघांकडून पिस्तुलातून गोळीबारगल्ल्यातील आठ ते १० हजारांची रोकड लुटलीवरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी, रात्री आरोपींचा शोध व गुन्ह्याची प्रक्रिया 

 लोकमत आॅनलाईन धुळे : शहरातील मालेगाव रोडवरील यलम्मा देवी मंदीर परिसरातील दूध डेअरीवर दुचाकीवर आलेल्या तिघांनी गोळीबार करून गल्ल्यातील रोकड लुटून नेली. ही घटना गुरूवारी रात्री साडेनऊ-पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणी जखमी झालेले नसून परिसरात भयाचे वातावरण आहे. मालेगावरोडवरील यलम्मादेवी मंदीराजवळ विठ्ठल (अप्पा) गवळी यांची न्यू प्रतीक डेअरी आहे. संध्याकाळी ६ ते १० यावेळेत दूध विक्री होते.गुरूवारी साडेनऊ-पावणेदहा वाजेच्या सुमारास अग्रसेन चौकाकडून दुचाकीवरून तिघे जण आले. त्यांनी काऊंटरच्या काचेवर पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे गल्ल्यावर बसलेले मालक विठ्ठल गवळी व कर्मचा-यांची भीतीने बोबडी वळाली. ते गल्ल्यावरून उठताच दोघांनी गल्ल्यातील रोकड ताब्यात घेऊन लगेच दुचाकीवरून दसेरा मैदानकडे जाणा-या रस्त्याने पळ काढला. मालक व कर्मचा-यांनी पाठलाग करू नये यासाठी दोघांपैकी एकाने फरशी उचलून दुकानाच्या दिशेने फेकली आणि लगेच पळ काढला. दरम्यान गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला. थोड्याच वेळात डेअरीजवळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली. दुकानदारांनी तत्काळ दुकाने बंद केली. वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. माहिती घेऊन  रात्री उशीरापर्यंत लुटारूंचा शोध  व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा