लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात स्लीपर कोच गाडीचे आगमन झाले आहे. या नवीन बसमुळे कल्याणपर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे.अनेक दिवसांपासून दोंडाईचा-कल्याण बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या आगाराला एक स्लीपर सिट व त्यातच एक सिटींग असलेली बस मिळाली आहे. सर्व सोयींनीयुक्त असलेली बस दोंडाईचा-कल्याण मार्गावर धावणार असून बसमुळे प्रवाशांची सोय झाली आहे.दोंडाईचा आगारातून पुणे, मुंबई अशा लांब पल्ल्याचा बसेसची अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर दोंडाईचा आगारात स्लीपर व सिटींग कोच बसेस आगाराला मिळाल्या असून दोंडाईचा येथून आता कल्याण जाणे सोयीस्कर झाले आहे.या नवीन बसेस धुळे जिल्ह्यात दोंडाईचा व शिरपूर आगाराला मिळाल्या आहेत. दोन्ही बस नंदुरबार ते कल्याण- दोंडाईचा मार्गे जाणार आहेत. प्रवाशांना आता खाजगी व्हिडीओ कोच बसेसप्रमाणे सर्व सुविधा मिळणार असून झोपून वा बसून प्रवास करता येणार आहे.दोंडाईचा आगारात दोन्ही बसेसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष वसंत बागल, उपाध्यक्ष जितेंद्र गिरासे, सचिव अर्जुन पाटील, हुसेनभाई विरदेलवाला, अगार प्रमुख सुरेखा चौरे, वाहन निरिक्षक निखील पाटील, महेंद्र भोई, लेखाकार भाईजी बाविस्कर व लिपिक लक्ष्मण कोळी, उदय पवार, नरेंद्र भाबड, विजय जाधव, ए.के. पाटील, जगदीश पटेल, सुरेश कोळी आदी उपस्थित होते.
राज्य परिवहन आगारात स्लीपर कोच दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:50 IST