शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

दुप्पटीने कोसळलेल्या पावसाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:59 IST

२००७ नंतरचा उच्चांक : जिल्ह्यात ६ नोब्हेेंबरपर्यत ८६०.७ मिलिमीटर पावसाची नोंद; धरणासह नदीनाले तुडुंब

ठळक मुद्देनकाणे, डेडरगाव, हरण्यामाळ तलाव ‘ओव्हरफ्लोजिल्ह्यात ५७० मि.मी. सरासरी असून ८६०.७ मि.मी. पाऊस चारही तालुक्यातील खरीपाच्या एकूण ४ लाख २९ हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसानयंदाचा पाऊस हा २००७ नंतरचा सर्वाधिक ठरलाशेतकºयांवर पुन्हा संकटतब्बल १२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर यंदा जून महिन्यात सुरू झालेला पाऊस

चंद्रकांत सोनार ।धुळे : तब्बल १२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर यंदा जून महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत थांबण्याचं नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचाही घास हिरावून घेतला आहे़ यंदाचा पाऊस हा २००७ नंतरचा सर्वाधिक ठरला आहे़जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत चार वर्ष दुष्काळी संकटाला सामोरे जावे लागले होते़ यंदा मात्र पावसाने चार वर्षाची भर काढत सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला़ जिल्ह्यात चारही तालुक्यातील खरीपाच्या एकूण ४ लाख २९ हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे़ त्यात ६२३ बाधीत गावातील २ लाख ६० हजार ७७६ शेतकºयांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्यावर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांना नोव्हेंबर महिन्यापासून चारा व पाणीटंचाई जाणवत होती़ त्यासाठी प्रशासनाकडून तब्बल ८९ टँकरव्दारे नागरिकांची तहान भागवावी लागली होती़ टंचाईपासून एकही तालुका दूर राहिला नव्हता़ तर चारा टंचाईमुळे शेतकºयांनी पशूधन देखील विक्रीला काढले होते़ यंदा सर्वत्र जोरदार पावसाने शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे़ गेल्यावर्षी कोरड्या दुष्काळाला तोंड देणाºया शेतकºयांना यंदा ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ जून महिन्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत दमदार हजेरी लावली़ त्यामुळे अवकाळीचा फटका चारही तालुक्यातील शेतकºयांना बसला़ कापूस, कांदा, सोयाबिन, मका अशा पिकांसाठी शेतकºयांनी टाकलेले भांडवल देखील शेतकºयांना यंदाच्या हंगामात काढता आलेले नाही़शेतकºयांवर पुन्हा संकटअरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, नाशिक, ठाणे जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत वादळी वाºयासह अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता हवामान खात्यानी वर्तविली आहे़ त्यामुळे पुन्हा शेतकºयांना निर्सगाच्या लहरीपणामुळे संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.कापूस, कांदे, भाजीपाला, मका, सोयाबिन पिकांना बसला फटकाजिल्ह्यात यंदा अवकाळी झालेल्या पावसाने शेतकºयांच्या कापूस, कांदा, सोयाबिन, मका, ज्वारी, बाजरी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ त्यातच शिंदखेडा तालुक्यातील कापडणे, मालपूर, तसेच साक्री व शिरपूर तालुक्यातील शेतकरी बाराही महिने भाजीपाला उत्पादन घेतात़ मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने टमाटे, वांगी, गिलके, दोडके, कोथिंबीर सडून गेले आहेत़ भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर येथील शेतकºयांचा चरितार्थ चालतो. पण आता परिस्थिती विपरित झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ यामुळे शेतकरी चितांतूर झाला आहे़ या पार्श्वभुमीवर शासनाने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. मात्र, शेतकºयांना आता तातडीने नुकसान भरपाईची गरज आहे.तालुकानिहाय पाऊसधुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस कोसळला आहे़ त्यात ६ नोव्हेंबरपर्यंत धुळे तालुक्यात सरासरी ६००.९ पावसाची नोंद आहे. यंदा ७५८ मिलीमिटर पाऊस पडला असून सरासरी ओलांडली आहे.साक्री तालुक्यात सरासरी ४५४ मि.मी. असून आतापर्यंत ९७३.५ मि.मी. पाऊस झाला आहे. शिरपूर तालुक्यात सरासरी ६७९.४ मि.मी. असून ९४६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर शिंदखेडा तालुक्यात सरासरी ५४५.८ मि.मी.असून ८१२.३ पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात ५७० मि.मी. सरासरी असून ८६०.७ मि.मी. पाऊस झाला आहे़ यंदा पावसाने नदीनाल्यांना देखील पुल आला आहे़ तर धुळे शहराला पाणीपुरवठा करणारे नकाणे, डेडरगाव, हरण्यामाळ तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे