शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील २८५० जलस्त्रोतांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:39 IST

१० आॅक्टोबरपासून मोहीम सुरू

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षातर्फे धुळे जिल्हयतील पिण्याच्या पाण्याच्या २ हजार ८५० स्त्रोतांची रासायनिक तपासणी मोबाईल अ‍ॅपद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी १० आॅक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोताचे स्वच्छता सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे राबविले जात आहे.राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून दरवर्षी पिण्याचे शुद्ध व निर्जंतुक पाणी ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जाणिव जागृतीचे उपक्रम हाती घेतले जातात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसळ्यानंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम आणि रासायनिक व जैविक तपासणी अभियान राबविले जाते. शासनाच्या सूचनेनुसार एमआरएसएसी नागपूर निर्मित जिओफेन्सिंग मोबाईल अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यांच्या नमुन्यांचे संकलन व जलस्त्रोतांची मॅपिंग ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जलसुरक्षक, यांच्या मार्फत केली जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सुमारे २,८५० स्त्रोत आहेत. या जलस्त्रोतांचे जीआयएस अ‍ॅसेट मॅपिंग करण्यात आलेले आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे जिल्ह्यातील जलस्त्रोतांची निश्चिती होण्यास मदत होणार आहे.अ‍ॅप संदर्भात ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेला माहिती होण्यासाठी धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार सांगळे यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हा पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमाची सभा पार पडली.यात मधुकर वाघ यांनी मार्गदर्शन केले. तर पाणी गुणवत्ता तज्ज्ञ विजय हेलिंगराव यांनी प्रात्याक्षिक सादर केले.हे अभियान १० आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडणार आहे. संकलित केलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या धुळे, शिरपूर, व दोंडाईचा येथील प्रयोगशाळेत नियोजित कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय पूर्ण करण्यात येणार आहे.दरम्यान या अभियानासोबतच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर २०१९ याकालावधीत आरोग्य विभागातर्फे राबविले जात आहे.या अभियानांतर्गत स्त्रोतांचा परिसर, योजनांमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखीमप्रमाणे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे, व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे