शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात दहिवेल येथील घरफोडीची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 18:28 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे यश : साक्री पोलिसांकडून वर्ग झाला होता गुन्हा

ठळक मुद्देसाक्री पोलिसांकडून एलसीबीकडे वर्ग झाला गुन्हाएका संशयिताला केले जेरबंद, १० तोळे सोने हस्तगतपोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेची उकल अवघ्या सहा महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासह मालमत्तेविरुध्द गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाण्यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत़ त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यासह मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पथक तयार केलेले आहेत़ साक्री तालुक्यातील दहिवेल येथे ४ मार्च २०१८ रोजी घरफोडीची घटना घडली होती़ वडीलांच्या औषधोपचारासाठी नाशिक येथे कुटुंबिय गेल्याने त्यांचे घर बंद होते़ बंद घराचा फायदा चोरट्याने घेतला आणि त्यांचे घर फोडले़ चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता़ परिवार घरी आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली़ त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यामुळे साक्री पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़ तपास सुरु असूनही फारसे यश मिळत नसल्यामुळे हे प्रकरण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता़ गुन्हा वर्ग झाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, हेड कॉन्स्टेबल संदिप थोरात, नथा भामरे, पोलीस कर्मचारी कुणाल पानपाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, उमेश पवार, रविकिरण राठोड, मनोज बागुल, विशाल पाटील, मायुस सोनवणे या पथकाने तपासाची चक्रे फिरविली़ त्यात हेड कॉन्स्टेबल संदिप थोरात यांना तपास कामी विशेष सुचना देण्यात आल्या होत्या़ त्यानंतर तपासाची चक्रे फिरवित गुन्हेगारांच्या माहितीचे संकलन करण्यात आले़ याप्रकरणी धुळे तालुक्यातील लोंढा नाला येथे भिका सदा भोई याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ त्याच्याकडून १० तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी