शिरपूर (जि.धुळे) : शहरातील महेशनगरात असलेल्या एका किराणा दुकानाच्या गोडावूनला शाॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. यात सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शहरातील महेश नगरात यशकिर्ती अशोककुमार जैन यांचे अशोक सेल्सनावाचे दुकान आहे. या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील गोडावूनला मंगळवारी दुपारी शार्टसर्कीटमुळे आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत दुकानातील किराणा माल खाक झाला. अग्नीशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत शिरपूर शहर पोलीस स्टेशनला नोंद झालेली नव्हती.
शिरपूर येथे शाॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 21:04 IST