झेड.बी. पाटील महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे प्रा.डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांचे " हिंदवी स्वराज्याची स्थापना " याविषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ.गिरासे पुढे म्हणाले की, जिजाऊंनी केलेले मार्गदर्शन व संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी राजे व छत्रपती संभाजी राजे घडले. त्यांनी मावळ्यांना सोबत घेऊन परकीयांच्या अन्याय व अत्याचाराने त्रस्त अशा समाजात आत्मविश्वास निर्माण करत परकीय तसेच स्वकियांशी संघर्ष करत रयतेसाठी स्वराज्य स्थापन केले. सर्वांसाठी समान कायदा व स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळत असे. स्वराज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. सद्य स्थितीत युवकांनी छत्रपती शहाजी राजे, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या संघर्षमय जीवन चरित्राचे पारायण करुन त्यातून प्रेरणा घेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधून आदर्श समाज निर्मिती तसेच राष्ट्र विकासात योगदान दिले पाहिजे.
डॉ.पंकज नन्नवरे म्हणाले की, युवकांनी छत्रपती शिवरायांचा संघर्ष व त्यागाचा चिंतनशील अभ्यास करुन स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करावे.
अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.व्ही.एस.पवार म्हणाले, शिवरायांनी बारा बलुतेदार व अठरापगड जातीच्या सैनिकांना सन्मानपूर्वक वागणूक देत अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून स्त्रियांचा सन्मान व सामान्य रयतेसाठी कायद्याचे स्वराज्य स्थापन करुन जगासमोर सर्वधर्मसमभावाचा आदर्श उभा केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो अधिकारी डॉ. प्रशांत कसबे यांनी तर रासेयो साहाय्य अधिकारी प्रा. प्रतीक शिंदे यांनी केले.