यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तेथे शाखा हे अभियान सुरू करून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवू, असे आश्वासन दिले. यावेळी मंगेश पवार, विश्वनाथ पाटील, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंग राजपूत, सर्जेराव पाटील, तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, छोटू पाटील, गणेश परदेशी, ईश्वर पाटील, संतोष देसले, देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके म्हणाले की, पद येणे-जाणे ही निरंतर प्रक्रिया आहे. परंतु पक्ष संघटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षासाठी सगळ्यांनी एक दिलाने, एक जोमाने काम करावे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यासाठी आजपासूनच कामाला लागावे. यावेळी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, दीपक चोरमले, उपजिल्हा संघटिका विनाताई वैद्य, तालुका समन्वयक विनायक पवार, युवासेनेचे प्रदीप पवार, विजय पाटील, अनिकेत बोरसे, शैलेश सोनार, राकाशेठ रूपचंदाणी, सागर देसले, नंदकिशोर पाटील, चंद्रसिंग ठाकूर, प्रताप सिसोदे, परमेश्वर पाटील, एस. डी. पाटील, वासुदेव शिंदे, रावसाहेब सैंदाणे आदी उपस्थित होते.
शिवसेनेचा एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST