नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र पिकांचे पंचनामे झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नयेत म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. ते म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरूवातीस पाऊस नसल्याने उत्पन्न कमी येणार होते. आता तर अतिवृष्टीमुळे येणारे उत्पन्न ही मिळणार नाही. तसेच मंडळाधिकारी,तलाठी हे आदेश नसल्याने पंचनामे करीत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना भेटून नुकसानीची वस्तुस्थिती मांडून तातडीने पंचनामे करण्याचे सांगितले जाईल. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा ही मिळवा यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी शिवसेना धुळे तालुका प्रमुख चंदू म्हस्के,उपतालुका प्रमुख आधार हाके,सुनील भागवत,मंगलसिंग गिरासे,नेर विभाग प्रमुख रवी वाघ,सतीश बोढरे,आण्णा भागवत,नामदेव बोरसे,देविदास भदाणे,कृष्णा खताळ,मधुकर माळी,दत्तु माळी,सुनील माळी,ज्ञानेश्वर माळी,मोतीलाल भोई,दीपक बोढरे,छोटु देवरे,संतोष बोरसे,मनोज अहिरे,संजय बोरसे,त्र्यंबक जगदाळे,बापू गवळे,संजय देशमुख,पोलीस पाटील विजय देशमुख आदी
उपस्थित होते.