शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर येथे गावठी पिस्तुलासह तीन लुटारु ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:14 IST

शिरपूरातील घटना : एकास नागरिकांनी तर दोघांना नाकाबंदीत पकडले

ठळक मुद्देशिरपूर शहरातील घटना पोलिसांकडे तीन ताब्यात दोन फरारसंशयितांना मिळाली पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरातील स्टेट बँक शाखेच्या एटीएम कक्षात ग्राहक मशिन आॅपरेट करीत असतांना पैसे न निघाल्यामुळे कॅन्सल बटन दाबण्याच्या आधीच त्या ग्राहकाच्या खात्यातून २० हजार रूपये काढून लुटल्याची घटना घडली़ लुटणाºया एकास पाठलाग करून  तर अन्य दोन जणांना नाकाबंदी करून पकडण्यात आले़ या तिघांच्या टोळीकडून गावठी पिस्तूलसह रोख रक्कम व वाहन असा एकूण ६ लाख ४१ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ उत्तर प्रदेशातील या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले.  शनिवारी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास येथील पीओपी वितरक वसिम रियाज पठाण, रा़स्टेट बँक कॉलनी करवंद नाका शिरपूर हे त्यांचे मित्र प्रफुल्ल राजपूत, मिलींद राजपूत यांच्यासोबत शहरातील स्टेट बँक शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले़ त्यावेळी त्यांचे अन्य दोन मित्र एटीएम कक्षाच्या बाहेर उभे होते़  यापूर्वीच एटीएम कक्षात तीन अनोळखी व्यक्ती पैसे काढण्यासाठी उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्यापैकी एकाने पैसे निघत नसल्याचे सांगून पठाण यांचे एटीएम कार्ड टाकून पाहिले़ काही वेळानंतर पुन्हा पठाण यांनी एटीएम कार्ड टाकले असता त्यापैकी एकाने लागलीच पठाण यांचे कार्ड काढून त्यांचे कार्ड टाकले़ मात्र त्यापूर्वीच पठाण यांनी पीन कोड टाकल्यामुळे त्यांचे २० हजार रूपये त्यांनी काढून घेतले़ पठाण यांना संशय आला़ ते पैसे घेवून अनोळखी तिघे इसम बाहेर पडत असतांना पठाण यांनी त्यांचा मागे जावून एकाचा हात पकडून एटीएम कक्षाकडे नेत असतांना त्याने हात झटकून पळ काढला़ महाराजा कॉम्प्लेक्स समोरील स्टेट बँकेजवळ उभी असलेली एम़एच़०३-९९८० या क्रमांकाच्या कारकडे धावत असतांना एकाला पकडण्यात आले़ त्याचवेळी पोलिस गस्त घालत तेथे आले. तेव्हा त्या चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ परंतु तत्पूर्वीच तेथून कार घेऊन दोघे  तेथून एसटी़स्टॅण्डच्या दिशेने पसार झाले़ घटनेचे वृत्त पोलिस निरीक्षक संजय सानप यांना कळताच यांनी लागलीच नाकाबंदी करण्याचे आदेश वायरलेसद्वारे दिले़ काही वेळानंतर पसार झालेली कार सांगवी पोलिसांना हाडाखेडगावाजवळ नाकाबंदीद्वारे पकडण्यात यश मिळाले. ही पाच जणांची टोळी उत्तर प्रदेशातील असून यावेळी मात्र दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून पिस्तूल, रोख रक्कम, मोबाईल व कार आदी मिळून ६ लाख ४१ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ याप्रकरणातील संशयित लुटारू ओमप्रकाश मनिराम जयस्वाल (२१) राक़ोठार मंगलेपूर पोस्ट सागरा सुंदरपुरा ता़लालगंज जिल्हा प्रतापगड (उत्तरप्रदेश) यास बँकेजवळच लोकांनी पकडून दिले होते़ तर सैय्यद खान कमालउद्दीन खान (२७) रा़तिलावरी पोस्ट सगरा सुंदरपूर लालगंज व तौफीक खान सनाप मुस्तकीम खान (२७) रा़सगरा सुंदरपूर लालगंज असे दोघांना नाकाबंदी करून जेरबंद करण्यात आले आहे़ या घटनेतील दोन जण फरार आहेत़ पुढील तपास सुरु आहे़