शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला केमिकल फॅक्टरीतील स्फोटात १३ ठार; ५२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 14:18 IST

पालकमंत्री, अधिकारी पोहचले : वाघाडी-बाळदे रस्त्यावरील सकाळची घटना

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथे एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात १२ जण ठार तर ५८ जण जखमी झाले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली. ही घटना वाघाडी-बाळदे रस्त्यावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक एम.एन. रत्नपारखी घटनास्थळी पोहचले. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिरपूर येथे असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत १२ जण ठार झाले असून जखमींची संख्याही वाढून ५२ पर्यंत पोहचली आहे.मृतांपैकी पीनाबाई जितेंद्र पावारा (३५, रा. चांदसूर्या), रोशनी पावरा (१४ रा. चांदसूर्या), सुबीबाई रमेश पावरा (२५ रा. चांदसूर्या ), पंजाबाई विशाल पावरा (२५, रा. वकवाड ), रमेश सजन कोळी(३५,रा. वाघाडी) यांची ओळख पडली असून, दोन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.दरम्यान ही कंपनी मुंबईच्या उमीत ग्रुपने चालवायला घेतली होती. या कंपनीत औषधांना लागणारे केमिकल तयार होत होते. कंपनीचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टमध्ये ४० ते ५० कामगार काम करतात. शिफ्ट बदलण्याच्यावेळेसच ही दुर्घटना घडली. या स्फोटांचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे