शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नरडाणा एमआयडीसीतील शिरपूर पॉवर प्लॅँट बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 11:54 IST

औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प : वीज खरेदीस सरकारची असमर्थता, हजारो रोजगारांवर गदा 

ठळक मुद्देउद्योगास अनपेक्षित विलंबखर्च ८०० कोटींनी वाढलाबँकाची कर्जास असमर्थता

सतीश चोरडिया । लोकमत न्यूज नेटवर्कनरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील बहुचर्चित शिरपूर पॉवर प्लँट हा औष्णिक विद्युत प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे़ यामुळे खान्देशच्या औद्योगिक जगतात खळबळ माजणार आहे. सद्यस्थितीतच पाचशे कामगारांचे रोजगार बुडाले आहेत. बॅँकांनीही कर्ज देण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे वृत्त आहे.  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत पंच तारांकित डी प्लस झोनची औद्योगिक वसाहत नरडाणा परिसरात १९९५-९६ पासून विकसित होत आहे़ गेल्या २३ वर्षात नावलौकिक होईल,  असा एकही मोठा उद्योग या औद्योगिक वसाहतीत अद्यापपर्यंत सुरू होऊ शकलेला नाही़ याला विविध कारणे असली तरी या औद्योगिक वसाहतीच्या २१२ एकरात विस्तारलेला शिरपूर पॉवर प्लँट या औष्णिक विद्युत निर्मितीच्या प्रकल्पाचे काम २०११ च्या सुरुवातीला सुरू झाले़ तेव्हा त्यास विविध अडचणींना तोंड द्यावे लागले़त्या अडचणींवर मात करत हा उद्योग पूर्णत्वास येत होता़ प्रकल्पाच्या सुरुवातीलाच वाघोदे, माळीच, जातोडा, येथील शेतकºयांनी शेतजमिनीला भाव द्यावा यासाठी या उद्योगाच्या उभारणीला विरोध केला़ तेव्हापासून या उद्योग उभारणीला ग्रहण लागले़ यात बºयाच शेतकºयांना मोबदला देण्याच्या कामात कंपनीच्या काही अधिकाºयांच्याही चुका झाल्या़ व्यवहारात झालेला अपहार व गोंधळात शेतकरी मात्र चक्रावला़ यात काही स्थानिकांनी सुध्दा मलिदा लाटला़ नंतरही या उद्योगाला विरोध सुरुच राहिला़ कधी स्थानिकांना रोजगार द्यावा, कधी पाणी, डंपर, वाळू, कॉन्ट्रॅक्ट, वस्तू विकत घेण्याची सक्ती आदींसह विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांनी त्यावेळी काढलेल्या मोर्चापर्यंत या उद्योगाच्या संचालकांना लढत रहावे लागले़ टॉवर उभारणीच्या कामात तर कमालीचे अडथळे आलेत़ उद्योगास अनपेक्षित विलंब२०११ला सुरू झालेले काम २०१५ पर्यंत संपणार होते़ परंतु २०१८ पर्यंतही हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही़ म्हणून विलंबामुळे कंपनीचा अनाठायी खर्च वाढला़ कर्मचाºयांचा पगार, व्याज यामुळे तसेच शेतकºयांच्या विरोधाला तोंड देत या प्र्रकल्पास ३ वर्ष विलंब झाला़ खर्च ८०० कोटींनी वाढलाया उद्योगाच्या उभारणीला १५०० कोटींचा निधी लागेल, असा अंदाज या उद्योगाच्या संचालकांनी घेतला होता़ परंतु तो चुकीचा ठरला़ ३ वर्ष विलंब झाल्याने व काही अडचणीमुळे या उद्योगाला जवळ जवळ ४०० कोटींची आवश्यकता हा प्रकल्प सुरु करण्यास लागणार आहे़त. बँकाची कर्जास असमर्थताया उद्योगाला कर्जासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा व आयडीबीआय या तीन बँकाचे वित्तीय सहकार्य लाभले आहे़ परंतु पुन्हा वाढीव कर्जाला या बँकांनी नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़ प्रकल्पाची चाचणी पूर्णया प्रकल्पाची चाचणी पूर्ण झाली असून कोळसा आणणे, रेल्वे ट्रॅक उभारणे आदींसह लहान कामांसाठी पैशांची गरज आहे़  चाचणीवेळी निर्माण झालेली वीज या प्रकल्पाने राज्य सरकारला विनामुल्य दिली आहे़ खरेतर यासाठी राज्य शासनाने वीज निर्मितीला लागलेला खर्च देणे अपेक्षित होते़ परंतु तो ही राज्य सरकारने दिलेला नाही़ सरकार वीज घेण्यास असमर्थहा प्रकल्प सुरु झाल्यानंतरही राज्य सरकार वीज विकत घेईल याची शाश्वती उरलेली नाही़ सरकारने मागितलेल्या दरात वीज विक्री करणे प्रकल्पास शक्य नाही़ कारण त्या दरात वीजनिर्मिती खर्च निघणेही शक्य नाही़ म्हणून या प्रकल्पाचे भविष्य सध्यातरी अधांतरी आहे़  अनेकांच्या आशा मावळल्याया प्रकल्पात कार्यरत असलेल्या १३० अधिकारी आणि कर्मचाºयांपैकी जवळपास १०० लोकांना घरी पाठविले़ आहे़ एकाच दिवशी १०० लोकांना घरी पाठविण्याच्या निर्णयाने अनेक बेरोजगारांच्या आशा मावळल्या़ तर, अनेक लहान उद्योगांवरही संक्रांत आली आहे़ यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला जाणार आहे़ संपूर्ण खान्देशला फटका२१२ एकरावरील व २५०० कोटींचा हा प्रकल्प सुरु झालेला नाही़ त्यामुळे खान्देशच्या औद्योगिक भवितव्यावर वीज कोसळणार आहे़ सरकार, अधिकारी, राजकारणी व परिसरातील नागरिकांच्या त्रासाला उद्योगपती पुरते कंटाळले आहेत़ यामुळे खान्देश उद्योगास अनुकूल नसल्याचा नकारात्मक सूर उद्योगपती आळवत असून या प्रकल्पामुळे त्यास दुजोरा मिळणार आहे. या संदर्भात कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणाशीही अधिकृत बोलणे झालेले नाही़ कंपनीत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु असून सुरक्षिततेसह मोजकाच स्टाफ राहणार आहे़ सीसीटीव्हीद्वारे या उद्योगाचे नियंत्रण व नियोजन अहमदाबाद येथून होणार असल्याची अधिकृत माहिती तेवढी मिळाली़ शिरपूर पॉवर प्लॅँट  ही  कंपनी सिंटेक्स प्लॅस्टिक या कंपनीची पूरक कंपनी आहे़ यामुळे या औद्योगिक क्षेत्रात येणाºया अल्ट्राटेक सिमेंट व सध्या काम पूर्णत्वास आलेल्या वंडर सिमेंट या दोन्ही कंपन्यांना सुद्धा धक्का बसला आहे.