शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी नेत्यांना दिला ‘एकी’चा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:51 IST

जि.प, पं.स. आणि महापालिका निवडणूक : काँग्रेस - राष्टÑवादीची आघाडी स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब  

ठळक मुद्देखासदार शरद पवार यांनी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले. त्याला उपस्थित सर्वच नेतेमंडळींनी होकारही दिला. महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीने लढविली जाईल, हे ही निश्चित झाल्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंदहपरंतू पक्षातील गटा-तटाच्या राजकारणाचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. कारण या गटा-तटाच्या राजकारणामुळे पक्षातील भल्या - भल्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या पाडापाडीच्या राजकारणाचा फटका दोन्ही पक्षांना अनेकदा बसला आहे.त्यामुळे आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी शरद पवारांनी आवाहन केल्याप्रमाणे गट-तट विसरुन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, अशी प्रामाणिक अपेक्षा सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.  

राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी रविवारी धुळ्यात दिलेल्या आपल्या  ९ मिनिटाच्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित  काँग्रेस व राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि आमदारांना  एकत्र येण्याचा कानमंत्र दिला. त्यामुळे आगामी मनपा आणि जि.प., पं.स. निवडणूक काँग्रेस - राष्टÑवादी एकत्र लढतील, यावर   शिक्कामोर्तब झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता आनंदीत झाला आहे. काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी स्थापनेसंदर्भात ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले.महापालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पाच वर्षानंतर खासदार शरद पवार हे धुळ्यात आले. त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने     धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे  यांच्यासह  काँग्रेस - राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष, धुळे महानगर अध्यक्ष  बºयाच दिवसानंतर एकाच व्यासपीठावर दिसले.  गेल्या महापालिका  आणि जि.प. निवडणुकीत शिंदखेडा तालुका वगळता  काँग्रेस आणि राष्टÑवादी एकमेकाच्या विरोधात उभे होते. यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळेपेक्षा परिस्थिती वेगळी आहे. महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. परंतु पाच वर्षात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर मंगळवारी राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्टÑवादी अडचणीत आले आहे. राष्टÑवादीला यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपात गेलेल्या नगरसेवकाच्या जागी किंवा त्यांच्यासमोर त्याच तुल्यबळाचे उमेदवार उभे करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत, हद्दवाढीत महानगरात समाविष्ट झालेल्या गावांच्या  जागा आणि मुस्लिम बहुल भागात ज्याठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे, त्या जागा काँग्रेसला दिल्यातर दोघांना त्याचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसची शहरात परिस्थिती काय हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे काँग्रेसला राष्टÑवादीची साथ मिळाली तर चांगला रिझल्ट मिळू शकतो, हे दोन्ही पक्ष जाणतात. जिल्हा परिषदेतसुद्धा मताची विभागणी  आणि ग्रामीण भागात भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी   काँग्रेस - राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे सर्व नेते जाणून आहे.राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि आमदारांनी आवर्जून उपस्थिती देऊन आघाडीस एकप्रकारे संमती  दर्शविली आहे. तर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आगामी दोन्ही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढवतील, अशी ग्वाही  आपल्या भाषणातून दिली. हाच धाग पकडून मनपा आणि जि.प.चे निकाल चांगले लागले तर  येणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा मिळेल. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम  करावे. त्यामुळे  शहर, जिल्ह्याचा आणि पुढे राज्याचाही विकास होईल, असा कानमंत्र खासदार शरद पवार यांनी आपल्या शैलीत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना दिला. आपल्या भाषणातून त्यांनी आगामी  दोन्ही निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढतील, हे सर्वांना स्पष्ट करुन दिले आहे. त्यांचा हा निर्णय दोन्ही पक्षांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेSharad Pawarशरद पवार