लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुस्लीम समाजाचा शब-ए-बरात हा पवित्र सण घरातच साजरा करण्याचा निर्णय मुस्लीम धर्मगुरू आणि समाजातील प्रतिष्ठींत नागरीकांनी घेतला आहे़ या निर्णयाचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी स्वागत केले आहे़शब-ए-बरात हा सण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो़ रात्री शहरातू भव्य मिरवणूक काढली जाते़ रात्रभर विविध प्रार्थना स्थळांवर गर्दी असते़ परंतु कोरोनामुळे यावर्षी कुणीही घराबाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़जमियत उलेमा हिंदने म्हटले आहे की, देशात कोरोनामूळे सुरक्षितता बाळगण्यात येत आहे. धुळे शहरात देखील मशिदीमधून पाच वेळा अजान दिली जाईल. यावेळी फक्त चार लोकांना मशिदीत नमाज पठण करता येईल. इतर नागरीकांनी घरातच नमाज पठण करावी़ तसेच येत्या गुरुवारी शाबान महिन्याची पंधरा तारीख म्हणजे शबे बरात (शुभ रात्र) आहे. या दिवशी देखील मशिदीत फक्त चार लोक नमाज पठण करतील. कब्रस्तान, दर्गा आदी ठिकाणी जावू नये, बाहेर फिरुन चौकाचौकात गर्दी करु नये़आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी व कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन जमियत उलेमाचे मुफ्ती सय्यद मोहम्मद कासीम जीलानी यांनी केले आहे़धुळे जिल्हा पोलिस दलासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला़ या निर्णयाचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी स्वागत केले असून घरात राहून प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़ या निर्णयाचे पालन केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे़ बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, पोलिस उप अधीक्षक रवींद्र सोनवणे, उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, मुस्लीम धर्मगुरू, मौलाना, मौलवी, प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते़
शब-ए-बरातही घरातच धर्मगुरूंचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:10 IST