शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

आईला किल्ल्यावरुन कोसळताना पाहून चिमकुल्या यशने फोडला टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : दिवाळीच्या सुटीत आई - बाबांसोबत पर्यटन, किल्ला गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी १२ वर्षाचा चिमुकला यश ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दिवाळीच्या सुटीत आई - बाबांसोबत पर्यटन, किल्ला गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी १२ वर्षाचा चिमुकला यश पहाटे सहा वाजताच उठून लळींग किल्ल्यावर गेला. काही क्षणातच आईला डोळ्यादेखत पाय घसरुन खाली पडतांना पाहून यशने आई....आई म्हणत हंबरडा फोडला. ग्रामस्थ तसेच त्याठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. पण खोल दरी असल्याने शेवटी आपत्ती निवारण पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन यशची आई ललीता चव्हाण यांना वर काढले. रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात पाठविले. परंतू रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्या गतप्राण झाल्या होत्या. अवघ्या काही क्षणातच होत्याचे नव्हते झाल्याने उपस्थितही भावविवश झाले.शहरातील गोपाळ नगरात धुळे पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहायक प्रफुल्ल चव्हाण हे आपल्या आई, पत्नी ललीता (वय ३७) आणि मुलगा यश (१२) यांच्या सोबत राहतात. प्रफुल्ल चव्हाण हे १० वर्षापासून जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये त्यानंतर एक वर्ष शिंदखेडा पंचायत समिती आणि आता गेल्या सहा महिन्यापासून धुळे पंचायत समितीत वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर सुटीत मुलगा यश आणि पत्नी ललीता सोबत त्यांनी शुक्रवारी सकाळी गिर्यारोहणाचा बेत केला होता. शहरानजीक महामार्गावर असलेल्या किल्ला लळींग येत जाणार होते. आपण आई -बाबांसोबत गिर्यारोहणाला जाणार म्हणून गुरुवारी रात्रीपासून यश हा खूप आनंदीत होता. शुक्रवारी पहाटे सहा वाजता आई -बाबांसोबत तो लळींग किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर पोहोचला. किल्ल्यावर पहाटे अनेक लोक व्यायाम आणि फिरण्यासाठी येत असतात. त्यांची बऱ्यापैकी गर्दी होती. किल्ल्यावरील एका कोपऱ्यात बुरुजाजवळ मंदीर होते. त्या मंदीराजवळ जाऊन आई ललीता चव्हाण यांनी पती प्रफुल्ल यांना फोटो काढण्यासाठी सांगितले.प्रफुल्ल फोटो काढत असतांना ललिता यांचा पाय हा त्याठिकाणी झालेल्या भुसभुशीत मातीवरुन घसरला आणि काही क्षणात त्या खाली कोसळल्या. ते पाहून यशने आई म्हणत टाहो फोडला. प्रफुल्ल यांनी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास धुळ्यातच राहणाऱ्या आपला भाऊ चेतनला कळविले. त्यामुळे भाऊ व त्यांचे मित्र सकाळी साडे नऊ वाजता किल्ल्यावर पोहोचले. ललीता चव्हाण यांचा शोध घेणे सुरु होते. त्या खोल दरीत झाडा - झुडपांमध्ये जखमी अवस्थेत दिसून आल्या. टोल नाक्यावरील रुग्णावाहिकेतील कर्मचारी आणि आपत्ती निवारण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ललीता चव्हाण यांना बाहेर काढून तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. डॉ. अरुण कुमार नागे यांनी तपासणी करुन ११ वाजून ५४ मिनिटांनी ललीता यांना मृत घोषीत केले.