गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढलेली असून, उन्हामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येताना व दुपारी घरी जाताना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उन्हाचा विद्यार्थ्यांच्या हजेरीवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भाागातील सर्व माध्यमिक विद्यालये सकाळच्या सत्रात भरविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे वि. मा. भामरे, डी. जे. मराठे, संजय पवार, निशांत रंधे, एच. व्ही. नांद्रे, विश्वास एन. पगार, हेमंतकुमार ठाकरे, के. डी. बच्छाव, के. के. नांद्रे, आर. टी. खैरनार, राजेंद्र भदाणे, आशा पाटील, नरेंद्र भामरे, हृषीकेश जावरे, एम. बी. मोरे, सुनील पवार, आर. आर. साळुंके, बी. आर. अहिरे, व्ही. यू. कुवर, एस. ए. अहिरराव, अविनाश भदाणे, योगेश बच्छाव, राहुल जी. पवार, एम. ए. जाधव, ए. एम. सोनवणे, एम. एच. देवरे, एम. एस. पाटील, डी. टी. पाटील, आर. टी. भदाणे, एस. वाय. पाटील आदी उपस्थित होते.