शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात शाळा डिजीटल, वर्गखोल्या मात्र धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 11:32 IST

विद्यार्थी जीव मुठीत घेऊनच गिरवतायेत ज्ञानाचे धडे

ठळक मुद्देजिल्ह्यात ११०३ जि.प. शाळा१९८ वर्ग खोल्या धोकेदायकग्रामपंचायतीच्या सूचनेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्याने, राज्यात त्याचा गौरव झालेला आहे. मात्र या डिजिटल शाळांमधील तब्बल १९८ वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीमुळे हे वास्तव समोर आले आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन, या शाळा खोल्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ४ हजार १०७ वर्ग खोल्या आहेत.  या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून थोडे थोडके नव्हे तर तब्बल ९० हजार ९८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी शाळांच्या वर्ग खोल्या धोकादायक झालेल्या आहेत. काही शाळांचे छत धोकेदायक झालेले आहे, काही शाळांच्या वर्ग खोल्या गळक्या आहेत, तुटलेल्या आहेत. शिक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या जिल्ह्यातील १९८  वर्ग खोल्या जीर्ण झाल्याचा अहवाल मांडला हाता. या खोल्या दुरुस्तीची गरज असल्याचे अहवालात नमूद केले होते.यात धुळे तालुक्यात ५५, साक्री तालुक्यात ६६, शिंदखेडा तालुक्यात १७ तर शिरपूर तालुक्यातील ६० वर्ग खोल्यांचा समावेश आहे.शाळा डिजिटल करणे काळाजी गरज आहे. मात्र त्याचबरोबर शाळा इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सध्या धोकेदायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी लाखोचा निधी लागतो. त्यामुळे शाळा डिजिटलबरोबरच जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांची दुरुस्तीही महत्त्वाची असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या सूचनाकडे दुर्लक्षया जीर्ण वर्ग खोल्यांबाबत संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींनी तक्रारी करूनही अद्याप त्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेले नसल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.