शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कापडणे येथे वर्गखोल्यांअभावी समाजमंदिरात शाळा

By admin | Updated: June 16, 2017 15:43 IST

चार वर्षापासून जि.प. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; पालकांची व्यक्त केली नाराजी

दीपक पाटील / ऑनलाईन लोकमत 

कापडणे,दि.16 - धुळे तालुक्यातील कापडणे येथील खोखरहाट्टी परिसरातील जि.प. शाळा क्रमांक पाचची स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे इयत्ता पहिले ते चौथीचे वर्ग चक्क गावातील समाजमंदिरातील एका खोलीत भरतात. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षापासून अशी परिस्थिती असताना त्याकडे जि.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 
शिक्षण सभापतींचे गाव 
धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नूतन शेखर पाटील या कापडणे गावातील रहिवाशी आहेत. तरीही त्यांच्या गावातील जि.प. शाळेसाठी स्वतंत्र इमारत नाही. एकीकडे जि.प. प्रशासनातर्फे डिजीटल शाळेचा बोलबोला केला जात आहे. मात्र, कापडणे गावातील जि.प. शाळा क्रमांक पाचच्या विद्याथ्र्याना चक्क समाजमंदिरातील एका खोलीत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. 
निधी प्राप्त नसल्याने रखडले काम 
कापडणे गावात एकूण जि.प.च्या पाच शाळा आहेत. भात नदीच्या पलीकडील किना:यालगत आदिवासी बहुल भागातील खोखरहाट्टी भागात जि.प. शाळा क्रमांक 5 आहे. ही शाळा 2013 पासून सुरू झाली. त्यानंतर या शाळेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, दोन वर्गखोल्या, शिक्षक दालन मंजूर करण्यात आले. परंतु, त्यासाठी लागणारा पाठपुरावा न झाल्यामुळे अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.  परिणामी,  शाळेच्या इमारतीचे व वर्गखोल्यांचे काम रखडलेले आहे. 
दोन शिक्षकांवर मदार 
सद्य:स्थितीत येथील शाळेत विद्याथ्र्याना शिक्षण देण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. त्यांना तब्बल इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग शिकवावे लागतात.  विशेष, म्हणजे या समाजमंदिरात आदिवासी बांधवांचे छोटे मंदिर आहे. त्यातील एका खोलीत शाळा सुरू असते. त्यामुळे मंदिरात भाविकांची वर्दळ असल्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
विद्याथ्र्याचा शैक्षणिक विकास खुंटला 
एकाच वर्गात बसून इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्याथ्र्याना शिकविले जात असल्यामुळे अनेक विद्याथ्र्याना शाळेत शिकविला जाणारा अभ्यास लक्षात राहत नाही. परिणामी, विद्याथ्र्याचा शैक्षणिक विकास खुंटला आहे. परिणामी,  पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळेसाठी त्वरित स्वतंत्र इमारत व शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.