शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

सतीदेवी यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:52 IST

बोरीस : भाविकांची मांदियाळी; लाखोंची उलाढाल; नवस फेडणाऱ्यांची गर्दी; चोरांनी केली हातसफाई

लोकमत न्यूज नेटवर्कलामकानी : धुळे तालुक्यातील बोरसी येथील प्रसिद्ध सतीदेवी यात्रोत्सवाला गुरुवार २३ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी नवस फेडण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखो रुपयांचे उलाढाल झाली. दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. ही यात्रा १० ते १५ दिवस सुरू असते. पहिल्याच दिवशी ४० ते ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.खान्देशात बोरीस येथील सतीदेवी यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. यात्रेला धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर जवळच्या नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातूनही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रोत्वात पहिल्याच दिवशी नवस फेडण्यासाठी मोठ्यासंख्येत भाविकांनी गर्दी केली होती. यात महिलांची संख्या जास्त प्रमाणात होती. दर्शनासाठी भाविकांना रांगेत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रोत्सवा दरम्यान लामकानी व बोरीस परिसरातील शाळांना सुट्या देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रेत महिलांसह विद्यार्थी व विद्यार्थिनीं यात्रोत्सवाची मजा घेतांना दिसून आले. यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी गावात विविध मार्गावरुन तगतरावची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. याठिकाणी नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी झाल्याने भुरट्या चोरांनी याचा फायदा घेत काही भाविकांचे पैसे लंपास केले. त्यामुळे काही भाविक मंदिरात जाऊन दर्शन न घेता बाहेरुनच दर्शन घेऊन निघून जातांना दिसले. मंदिरात परिसरात मिठाईच्या दुकानांसह, खेळण्यांची, सौंदर्यप्रसाधने, कटलरी, भांड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच पाळणे दाखल झाले आहेत. यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल दोन दिवस चालते. धुळे, नंदुरबार, साक्री, नवापूर, शिंदखेडा, जळगाव, मालेगाव येथून कुस्तीपटू येत असतात.

टॅग्स :Dhuleधुळे