शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील तुळशिराम नगरात साड्यांचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:51 IST

पहाटेची घटना : लाखोंचा माल लांबविला

धुळे : देवपुरातील तुळशिराम नगर परिसरातील स्टेट बँकेच्या जवळ असलेले साडी सेंटर चोरट्याने फोडल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़ सकाळी ही बाब उजेडात आली़ २५ हजार रुपये किंमतीच्या १५० साड्या लांबविल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले़ याशिवाय ७०० ते ८०० रुपये किंमतीच्या काही साड्याही लांबविण्यात आल्याने लाखोंचा माल लंपास झाल्याचे समोर येत आहे़ देवपुरातील तुळशिराम नगर परिसरातील स्टेट बँकेच्या जवळ श्रीराम रामलाल जांगीड यांच्या मालकीचे सपना साडी सेंटर आहे़ हे दुकान चोरट्याने लक्ष्य केले़ शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केल्यानंतर श्रीराम जांगीड हे घरी गेले़ शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले़ दुकानातील गल्ला पाहिला असता त्यातून रोकड लंपास झाल्याचे व दुकानात साड्या अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ या घटनेत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील २५ हजाराची रोकडसह १५० किंमतीच्या साड्या चोरुन नेल्या आहेत़ याशिवाय ७०० ते ८०० रुपये किंमतीच्या काही साड्या लंपास झाल्याने लाखांहून अधिक किंमतीच्या साड्यांचा यात समावेश आहे़ अशी माहिती दुकान मालक श्रीराम जांगीड यांनी सांगितले़ दुसºयांदा चोरीदेवपुरातील सपना साडी सेंटरमध्ये वर्षभरात दुसºयांदा चोरीची घटना घडली आहे़ याच दुकानात दोन अज्ञात महिला साडी घेण्याच्या बहाण्याने आलेल्या होत्या़ त्यांनी दुकान मालक जांगीड यांची नजर चुकवून ५० हजार रुपये किंमतीच्या साड्या लंपास केल्या होत्या़ त्या महिलांचा अद्याप शोध लागलेला नाही़ श्रीराम जांगीड यांच्या पत्नी साड्यांना पिको आणि फॉल लावण्याचेही काम दुकानात करतात़ दिवाळी असल्याने सध्या त्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर साड्या आलेल्या होत्या़ चोरट्यांनी त्या ही लंपास केल्याचे समोर येत आहे़ परिणामी जांगीड यांना त्या साड्यांचीही नुकसान भरपाई द्यावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी