शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

संगनमताने काढला कुंडाणे येथील तरुणाचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:23 IST

गोळी झाडली : घटनास्थळी पोलीस दाखल, तिघांना अटक, दोघे फरार

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) येथील सोमवारी रात्रीचा थरारएकावर झाडली गोळी, पाच जणांवर संशय, तिघे ताब्यात, दोघे फरारधुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पाच जणांनी संगनमत करुन एकावर गावठी कट्याची गोळी झाडली़ यात त्याचा मृत्यू ओढवला़ ही घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) याठिकाणी घडली़ मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला़ तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार झाले आहेत़ कुंडाण्यात रात्रीचा थरारधुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) शिवारातील कुंडाणे फाट्याच्या पुढे असलेल्या एका पडीत घराजवळ हा थरार घडला़ सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दीपक दगडू वाघ (२८) रा़ कुंडाणे (वार) याच्यावर गावठी कट्यातून गोळी झाडण्यात आली़ ही गोळी त्याच्या खांद्याला लागली आहे़ घटना घडल्यानंतर मारेकरी लागलीच घटनास्थळावरुन पळून गेले़ दीपक वाघ याला जखमी अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले़ उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली़ अधिकारी पोहचले घटनास्थळीघटनेचे वृत्त कळताच धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, साक्रीचे निलेश सोनवणे, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलीस उपनिरीक्षक आऱ एस़ माळी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़ मारेकºयांचा शोध घेण्यात आला़ पोलिसात गुन्हा दाखलया प्रकरणी साहेबराव विठ्ठल वाघ रा़ कुंडाणे (वार) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित अभय दिलीप अमृतसागर (रा़ कुंडाणे), पंकज परशराम जिसेजा (रा़ मोगलाई), भांग्या उर्फ मुकेशनाना उर्फ मुरलीधर अमृतसागर (रा़ रेल्वेस्टेशन रोड), पंकज उर्फ भुºया जीवन बागले (रा़ रमाईनगर, धुळे), गोटू दगडसिंग पावरा (रा़ कुंडाणे ता़ धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील अभय अमृतसागर, पंकज जिसेजा आणि गोटू पावरा यांना अटक करण्यात आली आहे़ तर भांग्या उर्फ मुकेशनाना उर्फ मुरलीधर अमृतसागर आणि पंकज उर्फ भुºया जीवन बागले हे दोघे फरार झाले आहेत़ मृतदेहाचे शवविच्छेदनसोमवारी रात्री दीपक दगडू वाघ याच्यावर गावठी कट्याने गोळी झाडल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मंगळवारी सकाळी आणण्यात आला असून शवविच्छेदन करण्याचे काम सुरु झाले आहे़ या घटनेची चर्चा गावात सुरु होती़