लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्यात आल्या होत्या़ तेथील खरेदी विक्री आणि लिलाव बंद करण्यात आले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते़ प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या चारही बाजार समित्यांमध्ये मंगळवारपासुन व्यवहार सुरळीत झाला आहे़धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाला विक्री करण्यासाठी शेतकºयांच्या नोंदणीची प्रक्रिया गेली तीन दिवस राबविली़ त्यात १५३ शेतकºयांनी नोंदणी केली़ त्यापैकी १५० शेतकºयांच्या वाहनांना मंगळवारी बाजरात प्रवेश दिला़ उर्वरीत तीन शेतकºयांना बुधवारी आपला शेतीमाल विक्री करता येणार आहे़ प्रशासनाने १५० वाहनांची मर्यादा आखून दिल्याने मंगळवारी बाजाराच्या दिवशी नेहमीप्रमाणे वर्दळ आणि गर्दी नव्हती़आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर सुरू झालेल्या बाजार समितीमध्ये पहिल्या दिवशी गव्हाची सर्वाधिक २२०० पोते आवक झाली़ गव्हाला १४२० ते १९४५ रुपये भाव मिळाला़ त्या पाठोपाठ मक्याची ५१५ पोते आवक झाली़ मक्याला एक हजार ५१ ते १४७५ रुपये भाव मिळाला़ ३८० पोते ज्वारीची आवक झाली़ ज्वारीला १३४१ ते २४०५ रुपये भाव मिळाला़ बाजरीची १२० गोण्या आवक झाली़ १३३१ पासुन सुरू झालेला बाजरीचा भाव ३१६० रुपयांवर स्थिरावला़ बाजरीला सरासरी दोन हजार पंचवीस रुपये भाव मिळाला़ गावरानी हरभरा ७२ गोण्या आवक झाली़ त्याला कमीत कमी ३५००, जास्तीत जास्त ३८९५ आणि सरासरी ३५५० रुपये भाव मिळाला़ पांढºया हरभºयाची ३० गोण्या आवक झाली़ त्याला २८०० ते ३९०५ रुपये भाव मिळाला़ भुईमुगाची दहा पोते आवक झाली़ त्याला ४०२५ ते ५५०० रुपये भाव मिळाला़ त्यापाठोपाठ ४० पोते दादरची आवक होवून तिला ३४०० रुपये भाव मिळाला़ कुळथी एक गोणी आवक झाली़ कुळथीला भाव १९०० रुपये मिळाला़कोरोना उपाययोजनांसाठी प्रशासनाने बाजार समित्यांमध्ये नोडल अधिकाºयांची नियुक्ती केली आहे़ बाजार समितीकडून प्रत्येक व्यक्तीचे थर्मल टेंपरेचर स्क्रिनिंग करणे, प्रवेशव्दाराजवळ हात निजंतुर्कीकरणासाठी उपाययोजना करणे, प्रत्येक व्यक्तीने तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग बाबत वांरवार उद्घोषणा करणे व फलकाव्दारे आवाहन करणे, बाजार संपल्यानंतर सोयीची वेळ निश्चित करून सोडियम हायपोक्लोराईट किंवा अन्य रसायनांची फवारणी आदी कामे बाजार समितीकडून करुन घेण्यासाठी समन्वय साधणे. या अधिकाºयांनी त्यांचे अधिनस्त मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा यथोचित वापर करून जिल्ह्यातील बाजार समितीत्यांच्या आवारामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जीवनावश्यक शेतमालाचे खरेदी विक्रीचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहील यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही व उपाययोजना बाजार समितीमार्फत करवून घ्याव्यात. केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करावा.सदर कामी टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा अथवा दिरंगाई केल्यास संबंधित नोडल अधिकाºयांविरुध्द कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे़
बाजार समित्यांमध्ये गव्हाची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:08 IST