शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

साक्रीसह धुळे तालुक्यातील गरताड येथे कर्जमुक्तीसाठी भर उन्हात ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:22 IST

सत्यशोधक शेतकरी सभा : गरताड गावानजिक रास्तारोकोसह जेलभरो आंदोलन

ठळक मुद्देधुळे तालुक्सातील गरताड गावानजिक शेतकºयांकडून रास्तारोको आंदोलन सुरु असताना माणुसकीचे दर्शन घडले़ यावेळी रस्त्याने जाणाºया एका रुग्णवाहिकेला तातडीने वाट मोकळी करुन देण्यात आली़ साक्रीत राज्य शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले़ या दरम्यान निघालेल्या रॅलीत पारंपारीक आदिवासी नृत्य तसेच शिबली डोक्यावर घेऊन नृत्य केल्याने हे आकर्षण ठरले़प्रशासनाला शेतकºयांनी सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/साक्री : सरसकट कर्जमाफी मिळावी; यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी धुळे तालुक्यातील गरताड आणि साक्री येथे सकाळी ११ वाजता जेलभरोसह रास्ता रोको  राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे करण्यात आले. दरम्यान, कॉ़ किशोर ढमाले आणि कॉ़ सुभाष काकुस्ते यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले़ यासंदर्भात तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की आदिवासी वनहक्क कायदा व पंचायत विस्तार अधिनियम (१९९६) पेसा अ‍ॅक्टची योग्य अंमलबजावणी करुन कसत असलेल्या जमिनीच्या वैयक्तिक हक्कांचे सातबारा उतारे द्या, कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी पेसा कायद्यातून सूट देऊ नये, पेसा कायद्यातून वगळलेल्या आदिवासी बहुल गावे, वस्त्या वाड्या पाड्या यांचा त्यात समावेश करा़ राहून गेलेले वनहक्क दावे स्विकारण्यात यावेत़ बेकायदेशिरपणे ग्रामपंचायतीकडे पाठविलेले वनहक्क दावे उपविभागीय समितीने स्वत:कडे घेऊन त्यांची पडताळणी करावी़ जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वनहक्क दावेदारांना तात्काळ नुकसान भरपाई वर्ग करा़ शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करुन उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा याप्रमाणे हमीभाव द्या़ शेतीमालाचे भाव कृत्रिमरीत्या पाडणारे शेतकरी विरोधी आयात-निर्यात धोरण बंद करा़ गोवंश हत्या बंदी, भूसंपादन, एसईझेड असे विविध प्रकारचे कायदे रद्द करा़ आदिवासी वन्नहक्कानुसार प्रमाणपत्र धारकांना बँक कर्ज पुरवठा करण्यास नकार देत आहेत, या बाबत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बँक शाखा अधिकाºयांना बोलवावी़ पट्टेधारकांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्यावी़ जिल्ह्यातील वनहक्क दावा दाखल केलेल्या दावेदारांचे जिल्हास्तरीय समिती व उपविभागीय स्तरीय समितीकडे प्रलंबित दावे त्वरित मंजूर करा़ आदिवासींना हक्कांपासून दूर ठेवण्याचे कारस्थान करीत असल्याने अशा वनकर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात यावा़ महसूल मंडळनिहाय शिबिर लावून आदिवासींच्या जातीचे दाखले त्वरित देण्यात यावे़ मागील शिबिरामध्ये मंजूर करुनही न दिलेले जातीचे दाखले त्वरित देण्यात यावे़ शेतकºयांना न विचारता त्यांनी घेतलेले कर्ज हे जुनेनवे करुन त्यांना कर्जमाफीच्या फायद्यापासून वंचित करुन शेतकºयांची दिशाभूल करणाºया सहकारी सोसायटी कर्मचाºयांवर शाखा अधिकाºयांवर गुन्हा नोंद करा़ कर्जमाफी झालेल्यांना कुठलेही व्याज आकारु नये़ दूध उत्पादकांना १२ जून २०१७ रोजी जाहीर केलेला प्रतिलीटर २७ रुपये दर द्यावा आणि मागील फरक लीटर मागे ७ रुपये या प्रमाणे दूध उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर त्वरित जमा करावा़ संपूर्ण थकीत वीजबिल माफ करावे़ पुढे पुरेशा दाबाने सलग वीजपुरवठा द्यावा़ फाटलेली जिर्ण झालेली झालेली रेशनकार्ड बदलून द्या़ टंचाईग्रस्त गावांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा अशा विविध मागण्या शेतकºयांनी प्रशासनापुढे सादर केल्या़

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री