धुळे : साक्री शहरातील प्रगती कॉलनीत राहणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या राहत्या घरी चोरट्याने डल्ला मारत ६ लाख १५ हजाराचा ऐवज लांबविला. या घटनेमुळे साक्री पोलिसात खळबळ उडाली. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून वरीष्ठांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
साक्री उपअधीक्षकांचे घर फोडले, सहा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 15:39 IST