शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

देवपुरात पैसे वाटप होत असल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:45 IST

द्वेषातून गुन्ह्याचे कारस्थान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील विधी महाविद्यालय परिसरात भाजपचे प्रचारक पैसे वाटप करण्यासाठी थांबल्याच्या संशयावरुन काही कार्यकर्त्यांनी त्यांना खोलीत डांबल्याने तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच आचारसंहिता पथकासह पोलीस घटनास्थळी आले़ त्यांनी खोलीची तपासणी केली असता तेथे काहीही आढळली नाही. ती अफवाच ठरली़ मात्र हे प्रकरण देवपूर पोलिसांपर्यंत पोहचले. निवडणुकीच्या  प्रचारासाठी काही मंडळी शहरात आली आहे. त्यांनी शहरातील हॉटेल्स, काही घरे भाड्याने घेतली आहेत़ भाजप कार्यकर्त्यांनी देवपूर विधी महाविद्यालय परिसरात त्याचपद्धतीने घर भाड्याने घेतले असून त्याठिकाणी काही प्रचारक थांबले आहेत़ ते मतदारांना पैसे वाटपासाठी आले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असल्याचा संशय आनंदा पाटील आणि अ‍ॅड़विशाल साळवे यांना आला़ यामुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्या प्रचारकांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारला़ यानंतर त्यांना त्यांच्या खोलीत कोंडून पोलिसांसह आचारसंहिता पथकाला बोलावून घेतले़ त्यासह उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदी घटनास्थळी आले़ त्यांनी खोलीसह  साहित्याची तपासणी केली़ मात्र तेथे डेमो मशिनशिवाय काहीही मिळाले नाही. यानंतर हा विषय थेट देवपूर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र काही काळ तणावाची स्थिती होती़ अखेर ती अफवाच ठरली़ द्वेषातून गुन्ह्याचे कारस्थानमी लोकसंग्रामतर्फे उमेदवारी करत असून मी वकील असल्याने अन्याय विरोधात लढणे माझा स्वभाव आहे. देवपूर पोलीस ठाण्यात माझ्या विरूद्ध राजकीय द्वेष भावनेतून गुन्हा दाखल केल्याचे अ‍ॅड.विशाल साळवे यांनी पत्रकाद्वारे कळविले. 

टॅग्स :Dhuleधुळे